[Marathi] दिल्लीत प्रदूषण वाढले, २१ नोव्हेंबरला आणखी तीव्र होणार

November 19, 2019 3:04 PM | Skymet Weather Team

दोन दिवस थोड्या प्रमाणात हवा स्वच्छ राहिल्यानंतर गेल्या २४ तासांत दिल्लीतील प्रदूषण पुन्हा एकदा किंचित वाढले आहे. दिल्ली आणि एनसीआर क्षेत्राचा एक प्रमुख भागात प्रदूषणाचे प्रमाण मध्यम पातळीवर असले तरी, एक्यूआयने काही भागांमध्ये ‘निकृष्ट ते अत्यंत निकृष्ट’ वर्गात प्रवेश केला आहे. तथापि, ही परिस्थिती लवकरच बदलेल आणि दुसऱ्या पश्चिमी विक्षोभाचे आगमन लक्षात घेता प्रदूषणात पुन्हा वाढ होईल.

स्कायमेट वेदरनुसार एक नवीन पश्चिमी विक्षोभ लवकरच पश्चिम हिमालयात जाईल. ही प्रणाली दिल्ली व एनसीआर प्रदेशात मध्यम वाऱ्यांचा प्रवाह प्रतिबंधित करेल. ज्यामुळे वायू प्रदूषकं पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळ स्थिरावतील.

शिवाय, ह्या प्रणालीमुळे उत्तरेकडील मैदानावर चक्रीय अभिसरण निर्माण होईल आणि आर्द्रता देखील वाढेल. जोराच्या वाऱ्यांचा अभाव आणि उच्च आर्द्रता पातळी राहिल्यामुळे दिल्लीकरांसाठी एक प्राणघातक संयोजन निर्माण होईल कारण धुके व प्रदूषकांसह मिसळतील ज्यामुळे धुरके (स्मॉग) तयार होईल.

हलके वारे प्रदूषकांना विखुरण्यास सक्षम होणार नाहीत. अशा प्रकारे, येत्या २४ तासांनंतर प्रदूषणाच्या पातळीत हळूहळू वाढ होईल आणि उद्यापर्यंत, एक्यूआय बहुतेक भागात ‘निकृष्ट ते अत्यंत निकृष्ट’ वर्गात प्रवेश करेल.

दरम्यान २१ किंवा २२ नोव्हेंबरपर्यंत ही परिस्थिती गंभीर बनण्याची शक्यता असून काही भागांत प्रदूषणाच्या तीव्र पातळीचा सामना करावा लागेल.

Image Credits – The Economic Times 

Any information taken from here should be credited to Skymet Weather

OTHER LATEST STORIES