[Marathi] दिल्लीत या हंगामातील पहिले धुके, दृश्यमानता ५०० मी पर्यंत, विमानांची उड्डाणे उशीराने होण्याची शक्यता

November 14, 2019 1:13 PM | Skymet Weather Team

पालम वेधशाळेने नोंदविल्यानुसार, आज राष्ट्रीय राजधानी दिल्लीत हंगामातील पहिला धुके अनुभवले गेले. भारतीय प्रमाणवेळेनुसार आज सकाळी ८:०० ते ८:३० च्या दरम्यान धावपट्टी क्रमांक २९ वर दृश्यमानता ७०० मीटर आहे तर धावपट्टी क्रमांक २८ वर ८०० मीटर होती.

आमच्या हवामानशास्त्रज्ञांच्या मते, हवेतील प्रदूषकांसह मिसळलेले धुके दिल्लीकरांसाठी घातक आहे, ज्यामुळे दृश्यमानता कमी होते. सध्या आर्द्रता वाढते आहे आणि हलके वारेही वाहत आहेत. तसेच ढगाळ वातावरणामुळे दव पॉईंट तापमान जास्त आहे. या सर्व घटकांमुळे दिल्ली आणि एनसीआरमध्ये धुक्याचा थर तयार होण्यास हातभार लागला आहे. दिवसभर अशीच हवामान परिस्थिती कायम राहण्याची शक्यता असून विमानांच्या उड्डाणांना देखील किरकोळ उशीर होऊ शकतो.

नोव्हेंबर महिन्यात देशाच्या उत्तरेकडील मैदानी भागात वारंवार धुके उद्भवते. गेल्या अनेक दिवसांपासून अमृतसर आणि इतर अनेक शहरांमध्ये पहाटे धुक्याची नोंद होत आहे आणि दृश्यमानता ३००-२०० मीटरपर्यंत खाली गेली आहे. हळूहळू दिल्लीत देखील या गतिविधी अनुभण्यात येतील.

हवामान प्रणालींविषयी सांगायचे झाले तर पश्चिमी विक्षोभ जम्मू-काश्मीरवर आहे आणि त्यामुळे प्रेरित चक्रवाती अभिसरण राजस्थानवर आहे. अरबी समुद्रावरून आर्द्र वार्‍यांचा परिणाम दिल्ली आणि एनसीआर क्षेत्रावरही होत आहे. त्यामुळे जास्त आर्द्रता, कमी तापमान आणि हलके वारे यामुळे दिल्लीतही उद्या धुके असण्याची शक्यता आहे.

१६ नोव्हेंबरनंतर वायव्य दिशेकडून वारा वेग पकडू लागेल आणि परिणामी धुके हळूहळू नाहीसे होवू लागेल, ज्यामुळे दृश्यमान पातळीत सुधारणा होईल.

Image Credits – APN Live

Any information taken from here should be credited to Skymet Weather

OTHER LATEST STORIES