[Marathi]दिल्लीत तीव्र उष्णतेची लाट, पारा ४५ अंश ओलांडण्याची शक्यता

May 29, 2019 4:18 PM | Skymet Weather Team

पुढील ४८ तासांत दिल्ली आणि एनसीआर मध्ये तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता असून तापमान ४५ अंशाच्या वर जावू शकते. स्कायमेट हवामानतज्ञांच्या अनुसार आज दिल्लीत तापमान ४४ अंश सेल्सिअस इतके नोंदले जावू शकते तर उद्या पारा ४५ अंशाच्या घरात पोहोचू शकतो.

सर्वसाधारणपणे या काळात तापमान ४० अंश सेल्सियसच्या आसपास असते. पण गेल्या दोन-तीन दिवसांपासून तापमानात वाढ होत आहे. काल दिल्लीत सर्वाधिक तापमान ४१.८ अंश सेल्सियस नोंदले गेले, जे सामान्यपेक्षा एक अंश अधिक होते.

पुढील एक आठवडा तरी संपूर्ण दिल्ली आणि एनसीआर क्षेत्रामध्ये कोरड्या हवामानाची स्थिती राहण्याची अपेक्षा असून, याकाळात दिल्ली आणि आसपासच्या भागात वायव्येकडून येणारे कोरडे व गरम वारे सुरूच राहतील. तथापि, पश्चिम हिमालय पश्चिमी विक्षोभामुळे प्रभावित होईल, परंतु हवामान प्रणाली कमकुवत असल्यामुळे दिल्ली आणि एनसीआरसह उत्तरी मैदानांवरील क्षेत्रावर प्रभाव पाडण्यास अपयशी राहील. या कालावधीत आकाश मुख्यतः निरभ्र राहील.

साधारणपणे दिल्ली आणि एनसीआरमध्ये मान्सूनला २९ जूनला सुरुवात होत असते परंतु यावर्षी विलंब होऊ शकतो.

दिल्लीत एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात उष्णतेचि लाट सदृश्य परीस्थिती निर्माण झाली होती. त्याकाळात पालम येथे ३० एप्रिल रोजी येथील तापमान ४३.४ अंश सेल्सियस इतके होते. तेव्हापासून, दिल्लीतील लोकांना उष्णतेच्या लाटेपासून दिलासा मिळाला होता. परंतु मेच्या शेवटच्या आठवड्यात परिस्थिती विपरीत  झाल्याचे सिद्ध होत आहे.

Image Credits – Wikipedia

Any information taken from here should be credited to Skymet Weather

OTHER LATEST STORIES