बंगालच्या उपसागरात नैऋत्य दिशेला चक्रवाती हवेचे क्षेत्र निर्माण झाले आहे आणि त्यामुळे तामिळनाडूतील उत्तरेकडील भागात आणि दक्षिण कर्नाटकातील काही भागात येत्या ४८ तासात चांगलाच पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच केरळात तुरळक पावसाची शक्यता आहे. स्कायमेट या संस्थेतील हवामान विभागातील हवामानाच्या अभ्यासासाठी वापरल्या जाणाऱ्या मॉडेल्स नुसार केरळात होणाऱ्या पावसाला अजूनही फारशी गती नसल्याचे आढळले आहे.
दरवर्षीपेक्षा यंदा मान्सून ठरलेल्या वेळेआधीच अंदमान निकोबारला हजर झाला होता पण पुढच्या प्रवासाची गती मात्र कमी झाली आहे. श्रीलंकेच्या दक्षिणेकडील भागात आल्यावर मान्सूनची तीव्रता काहीशी कमी झाली आणि त्यामुळेच उत्तरेकडे होणारा पुढचा प्रवास हम्बान्तोता येथे आठवडाभर थंडावल्या सारखा झाला.
मान्सूनचा उत्तरेकडे होणाऱ्या प्रवासात २८ मे रोजी कोलंबोत दाखल झालेला असून तेथून पुढे त्यात काहीच प्रगती नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मान्सूनचे आगमन केरळात वेळेवरच होणार असा अंदाज स्कायमेट आणि जगातील इतर हवामान संस्थांनी दिला होता पण तरीही मान्सूनचे याआधीचे वर्तन बघता याचा अंदाज देणे म्हणजे एखाद्या उनाड किंवा कामचुकार मुलाच्या वर्तनाचा अंदाज देण्यासारखे आहे असे म्हणावयास हरकत नाही. स्कायमेट या हवामान संस्थेनं पुनःपुन्हा याचा उल्लेख केला आहे कि केरळला येणाऱ्या मान्सूनची वेळ जाहीर करण्यापूर्वी ठराविक मार्गदर्शक सूचनांचा पाठपुरावा करावाच लागतो.
मान्सूनच्या आगमनाचे महत्वाचे निकष असतात त्यातील एक म्हणजे केरळात एकूण १४ ठिकाणे आहेत त्यापैकी ६० टक्के भागात सलग दोन दिवस २.५ मिमी पावसाची नोंद झाली पाहिजे तरच चांगल्या मान्सूनचे आगमन होते. मान्सूनचे नेहमीच ठरावीक साचेबद्ध आगमन होतेच असे नाही आणि त्यामुळेच आपण नेहमीच मान्सूनचे आगमन उशीराच होणार असे गृहीत धरूनच तयारीत असले पाहिजे.
मान्सून नेहमीच आपण दिलेल्या अंदाजाला आव्हान देत असतो अगदी असेच जे यावर्षीही घडते आहे. मान्सूनचा पाऊस केरळात ३ जूनला दाखल होईल असा अंदाज आहे. द्वीपकल्पावर तुरळक पाऊस येतच राहील पण तरीही मान्सूनच्या आगमन होईपर्यंत वाट पाहणे हाच एक उत्तम पर्याय आहे. या दरम्यान केरळात तुरळक पाऊस होतच राहील.
Image Credit: thecampusconnect.com