मान्सूनच्या आगमनाला जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत उशीर झाला तर सामान्यपणे या कालावधीत पेरणीचे काम पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांच्या उडीद आणि मुग या पिकांचे नुकसान होऊ शकते.
महाराष्ट्र कृषी विभागाने मान्सूनच्या आगमनाला होणारा उशीर लक्षात घेऊन शेतकऱ्यांना पेरणीच्या कामकाजास विलंब करण्यास सुचविले आहे. मान्सूनच्या आगमनाला जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत उशीर झाला तर सामान्यपणे या कालावधीत पेरणीचे काम पूर्ण होणाऱ्या उडीद आणि मुग या पिकांचे नुकसान होऊ शकते.
केरळमध्ये आगमनानंतर साधारणपणे सात दिवसांच्या आतच मान्सून महाराष्ट्रात आणि मध्य भारताच्या इतर भागात दाखल होतो. केरळात आगमनास विलंब होणार असल्यामुळे महाराष्ट्रात मान्सून जूनच्या दुसऱ्या आठवड्यात पोहोचण्याची अपेक्षा आहे.
कृषी आयुक्त सुहास दिवासे म्हणाले की, मान्सूनला विलंब होणार असल्याने शेतकऱ्यांनी उशिरा पेरणी करावी. तसेच एकीकृत कीड व्यवस्थापन कार्यक्रमाचा भाग म्हणून कापसाच्या बोंड अळीचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी मान्सूनपूर्व कापसाची पेरणी टाळावी. वेळे अगोदर पेरणी रोखण्यासाठी मे महिन्याच्या अखेरीपर्यंत विभागाने कापूस बियाणे विक्रीवर बंदी घातली आहे.
Also read in English: Maharashtra Govt mulls on another loan waiver for farmers as water scarcity intensifies
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी खरीप हा सोयाबीन, तूर, गहू, मुग, उडीद व कापूस यासारख्या पिकांच्या दृष्टीने प्रमुख हंगाम आहे. यापैकी मुग आणि उडीद या अल्प कालावधीच्या पिकांची शेतकरी सामान्यतः जूनमध्ये पेरणी करून तीन महिन्यांनंतर कापणी करतात. सामान्यतः राज्यात सुमारे ८ लाख हेक्टर क्षेत्रावर या पिकांची पेरणी होते. मान्सूनला जर उशीर झाला तर ही दोन्ही पिकं प्रभावित होतील. दाल मिल संचालक व व्यापारी नितीन कलन्त्री यांच्या मते राजस्थानसारख्या राज्यात चांगला पाऊस झाला तर मुग पिकाच्या क्षेत्रामध्ये कदाचित जास्त फरक होणार नाही.
शेतक-यांसाठी आणखी एक चिंतेची बाब म्हणजे त्यांच्या जनावरांसाठी पिण्याचे पाणी आणि चारा यांची उपलब्धता. राज्यात दुधाचे उत्पादन सुमारे २० टक्क्यांनी घसरले असून कोरड्या चाऱ्याच्या किमतीत भरमसाठ वाढ झाली आहे. जर पाऊस वेळेवर नाही आला तर परिस्थिती अजून बिकट होईल. शेतक-यांना भाजीपाला पिकांचे संभाव्य नुकसान हि आणखी एक चिंता भेडसावत आहे. नाशिक मार्केटचे व्यापारी, जगदीश अप्सुंडे म्हणाले की सध्याचा भाजीपाला किड्यापासून प्रभावित आहे. "बाजारपेठेत उशिरा आवक असल्याने भाजीपाल्याच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. जर मान्सूनला सात दिवसांपेक्षा जास्त उशीर झाला तर परिस्थिती अजून कठीण होईल "असेही ते म्हणाले.
प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया
येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे