स्कायमेटने मॉन्सूनच्या आगमनाचा अंदाज दिला असून आगमनाला तीन ते चार दिवसांनी विलंब होईल असे म्हटले आहे. अशाप्रकारे, मोसमी पाऊस ४ जून रोजी केरळ मध्ये दाखल होईल. त्यात २ दिवस मागे पुढे होऊ शकतात.
केरळ मध्ये आगमनानंतर मॉन्सूनची प्रगती मंदावेल, त्यामुळे मुंबई आणि आसपासच्या भागात साधारणपणे ८ ते १० जूनच्या दरम्यान पोहोचणाऱ्या मॉन्सूनला चार ते पाच दिवसांचा विलंब होईल.
दरम्यान, मुंबई शहर परिसरात ७ जून रोजी पुर्व मॉन्सून गतिविधींना सुरुवात होऊन हळूहळू त्याची तीव्रता वाढेल. साधारण १४ जून पर्यंत, मुंबई मध्ये मॉन्सून ची सुरुवात होईल अशी अपेक्षा आहे. अशा प्रकारे, मुंबईकरांना दमदार पावसासाठी कमीत कमी २० ते २५ दिवस वाट पहावी लागेल.
पूर्व मान्सून हंगामाविषयी बोलायचे झाल्यास यावेळी मुंबईचे हवामान गेल्या अनेक दिवसांपासून कोरडे राहिले आहे. तापमान सामान्य असून किमान तापमानही सामान्य पेक्षा कमी आहे. पुढील तीन दिवसांपर्यंत हवामानाच्या परिस्थितीत कोणताही बदल अपेक्षित नाही. त्यानंतर, १९ मे नंतर तापमानात एक ते दोन अंशांनी वाढ होईल. हवामान किमान एक आठवड्यापर्यंत कोरडेच राहण्याची शक्यता आहे.
Also read in English: Monsoon in Mumbai to be delayed, Pre Monsoon season to be deficient
येत्या २५ आणि २६ मे रोजी मुंबई शहरात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुन्हा हवामान कोरडे होईल. त्यामुळे, मुंबई आणि आसपासच्या भागात मे महिन्यामध्ये पूर्व मॉन्सून पावसाचा जोर कमी राहणार.
थोडक्यात, मे महिन्यामध्ये पावसाचे प्रमाण कमी असणार आहे, मुंबई मध्ये पूर्व मॉन्सून पावसाची कमतरता राहील.
प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया
येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे