अखेरीस अरबी समुद्रात चक्रीवादळ हिक्का तयार झालेअसून चक्रीवादळास हिक्का हे नाव मालदीवने दिले आहे. मध्य-पूर्व आणि अरबी समुद्रात उत्तरेस असलेल्या तीव्र कमीदाबाच्या भागाचे रूपांतर चक्रीवादळात झाले असून सध्या अरबी समुद्रात अक्षांश २०.३ अंश उत्तर आणि रेखांश ६५.९अंश पूर्वेस स्थित आहे.
सध्या हिक्का चक्रीवादळ गुजरातच्या किनाऱ्यापासून ४०० किमी दूर आणि पाकिस्तानपासून ५०० किमी अंतरावर असूनते पश्चिम-वायव्य दिशेने पुढे सरकत आहे. त्यानंतर चक्रीवादळ पश्चिम नैऋत्येकडे मार्गक्रमण करेल यामागील प्रमुख कारणअरब द्वीपकल्पावरील प्रति चक्रवात असून त्यामुळे हिक्काच्या गतिविधी त्या दिशेने मर्यादित राहतील. सध्या, हिक्का १० किमी प्रतितास वेगाने मार्गक्रमण करीत असून वाऱ्यांचा वेग ९0 किमी प्रतितास आहे.
समुद्राच्या परिस्थितीबद्दल बोलायचे तर, भूपृष्ठाजवळील वखूप उंचीवरून वाहणारे वारे यांच्या वेगातील फरक मध्यम असून समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान २९ ते ३०अंश सेल्सिअस दरम्यान आहे. चक्रीवादळा करिता वाऱ्यांच्या वेगातील फरक मध्यम किंवा कमी असल्यास पोषक परिस्थिती असते तर याउलट फरक जास्त झाल्यास चक्रीवादळ कमकुवत होते.
पुढील ४८ तासांत हिक्का ओमानच्या किनारपट्टीला दक्षिणेकडे डुकम येथे धडकण्याची अपेक्षा आहे. डुकम हेबंदर असून येथे रिफायनरी देखील आहेत.
भारतीयमुख्य भूभागावर होणाऱ्या संभावित परिणामांविषयी सांगायचे झालेच तर या वादळामुळे गुजरातच्या किनारपट्टीला धोक्याची शक्यता नसून या प्रणालीच्या प्रभावामुळे आज सौराष्ट्र व कच्छ येथे केवळ ढगाळ वातावरण आणि हलक्या पावसाची शक्यता आहे.
Image Credits – Free Press Journal
Any information taken from here should be credited to Skymet Weather