काही दिवसांपूर्वी अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावामुळे गुजरातमध्ये पावसाळी गतिविधी सुरु होत्या. गेल्या २४ तासांत गुजरातमधील दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये विखुरलेला हलका ते मध्यम पाऊस नोंदला गेला. पूर्वेकडील वडोदरा येथे १२.४ मिमी पावसाची नोंद झाली. तर पोरबंदर आणि वेरावळमध्ये अनुक्रमे ११ मिमी आणि ५.४ मिमी पाऊस पडला.
आमच्या तज्ज्ञांच्या मते, येत्या २४ ते ४८ तासांत गुजरातच्या दक्षिण आणि पूर्वेकडील भागात एक- दोन मध्यम सरींसह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
ईशान्य आणि पूर्वेकडील अरबी समुद्रात असलेले चक्रीवादळ हिक्का आणखीन पुढे सरकण्याची शक्यता आहे. म्हणून, त्याचा प्रभाव नगण्य असेल. तथापि, २५ सप्टेंबरच्या सुमारास दक्षिण गुजरातमध्ये आणखी एक चक्रवाती प्रणाली तयार होणे अपेक्षित आहे.
त्यामुळे २६ किंवा २७ सप्टेंबरच्या आसपास पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच २६ ते २८ सप्टेंबर दरम्यान मध्यम पावसाची शक्यता असून तुरळक ठिकाणी एक दोन जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे. याकाळात, सौराष्ट्र आणि कच्छ परिसरामध्ये पावसाळी गतिविधी पुनरुज्जीवीत होतील. आतापर्यंत कमकुवत पावसाळी गतिविधी राहिलेल्या कच्छमध्ये देखील मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मेहसाणा, पाटण, इदार, साबरकांठा, बनसकांठा, भुज, नलिया, जामनगर, कांडला, द्वारका, ओखा अशा ठिकाणी २६ ते २८ सप्टेंबर दरम्यान चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे.
या पावसाच्या पार्श्वभूमीवर, गुजरातसह सौराष्ट्र आणि कच्छ मध्ये आधीच असलेले अनुक्रमे २५ आणि ४४ टक्के असलेले पावसाचे आधिक्य अजून वाढण्याची शक्यता आहे.
Image Credits – The Daily Star
Any information taken from here should be credited to Skymet Weather