Skymet weather

[Marathi] अरबी समुद्रावरील संभाव्य "वायु" चक्रीवादळामुळे केरळ आणि कर्नाटकमध्ये जोरदार पाऊस

June 10, 2019 6:34 PM |

Monsoon rain in Karnataka and Kerala

केरळमध्ये मान्सूनच्या आगमनानंतर कर्नाटक किनारपट्टीवर आणि केरळात पावसामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. गेल्या ४८ तासांत केरळमध्ये बऱ्याच भागात अतिवृष्टीची नोंद झाली आहे.

गेल्या २४ तासांत केरळमधील विविध ठिकाणी नोंदलेल्या पावसाचा आढावा:

Monsoon rain in Karnataka and Kerala

स्कायमेटच्या अंदाजानुसार, कमी दाबाच्या पट्ट्याचे कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर झाले आहे. तसेच पुढील २४ ते ४८ तासांमध्ये हि प्रणाली चक्रीवादळाचे स्वरूप घेण्याची शक्यता आहे. ह्या चक्रीवादळाला "वायू" असे नाव दिले जाईल.

या प्रणालीच्या प्रभावामुळे, केरळ आणि कर्नाटकच्या किनारी भागात अतिवृष्टीसह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. शिवाय, कर्नाटकमध्ये मंगळुर आणि आसपासच्या किनारपट्टी जिल्ह्यांत पुढील दोन ते तीन दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. या गतिविधींच्या पार्श्वभूमीवर, केरळ आणि कर्नाटक मधील तापमानात घट होईल.

पुढील ४८ तासांनंतर ही प्रणाली थोडी दूर गेल्यानंतर केरळमध्ये पावसाचा जोर कमी होण्याची अपेक्षा आहे, तथापि, कर्नाटकच्या किनारपट्टीवर पावसाळी गतिविधींमध्ये हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे. पुढील दोन-तीन दिवसांत या क्षेत्रात मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे.

त्याउलट, अंतर्गत भागात हवामानाविषयक गतिविधी तुलनेने कमी असतील याचे मुख्य कारण म्हणजे आर्द्र वारे आता संभाव्य चक्रीवादळ "वायू" कडे आकृष्ट होतील. परंतु उत्तर कर्नाटकमध्ये एक दोन मुसळधार सरींची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान तेलंगाणातील बहुतेक भाग उष्ण वातावरणामुळे जवळजवळ कोरडेच राहतील.

उपरोक्त हवामान प्रणाली व्यतिरिक्त, आंध्र किनारपट्टीच्या जवळ बंगालच्या पश्चिम मध्य खाडीवर एक चक्रवाती प्रणाली उपस्थित आहे. ज्यामुळे, आंध्रप्रदेशच्या किनारी भागामध्ये गडगडासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. किंबहुना, आंध्रप्रदेशच्या उत्तर किनारपट्टीवर आणि काकीनाडा, विजयनगरम आणि श्रीकुलमम या ओडिशाजवळील भागांमध्ये दुपारी किंवा संध्याकाळी मुसळधार पाऊस पडू शकतो. पुढील २४ ते ४८ तासांमध्ये रायलसीमेमध्ये देखील हलका पाऊस अनुभवला जावू शकतो.

याशिवाय पश्चिम मध्य बंगालच्या खाडीवरील चक्रवाती प्रणालीच्या पार्श्वभूमीवर अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहांवर जोरदार पाऊस होईल. आता, पुढील दोन-तीन दिवस या भागांवर मुसळधार पावसाची अपेक्षा आहे. ज्यामुळे, पर्यटकांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

Image Credit: SocialNews.XYZ

Please Note: Any information picked from here must be attributed to skymetweather.com






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try