Skymet weather

[Marathi] पवन या वर्षातील आठवे चक्रीवादळ अरबी समुद्रात तयार, सोमालियाकडे जाण्याची अपेक्षा भारतास धोका नाही

December 5, 2019 3:50 PM |

cyclone Pawan

'पवन' भारतीय समुद्रातील आठवे चक्रीवादळ अखेरीस अरबी समुद्रामध्ये तयार झाले असून सध्या अक्षांश ९.६ अंश उत्तर आणि रेखांश ५६.२ अंश पूर्वेकडे असून सोमालियाकडे जात आहे. ही प्रणाली सोमालियाच्या किनारपट्टीपासून सुमारे ३०० किमी अंतरावर आणि सलालाच्या आग्नेय दिशेस ८०० किमी अंतरावर आहे.

चक्रीवादळ आणखी तीव्र होण्याची अपेक्षा नाही पण पुढच्या ४८ तासांत हळूहळू कमकुवत होईल. पुढील १२ तासांत पवन पश्चिमेकडे जाईल आणि त्यानंतर दक्षिणेकडे जाईल. पवन चक्रीवादळ राजधानी मोगादिशुच्या उत्तरेस सुमारे २०० किमी अंतरावर धडकण्याची शक्यता आहे. चक्रीवादळ भारतीय मुख्य भूमीपासून बरेच दूर सरकले आहे, त्यामुळे वादळाचा काहीच परिणाम होण्याची शक्यता नाही.

चक्रीवादळ ७ डिसेंबरच्या संध्याकाळच्या सुमारास जमिनीवर येईल, म्हणजेच आतापासून ४८ तासांचा अवधी आहे. जमिनीवर येताच चक्रीवादळ लवकरच कमी दाबाच्या क्षेत्रामध्ये कमकुवत होईल. शिवाय, पवन कमकुवत चक्रीवादळ म्हणून सोमालिया किनारपट्टीवर धडकेल.

आतापर्यंत, वातावरणातील दोन थरांच्या दरम्यान असलेल्या वाऱ्यांच्या वेगातील तफावत अनुकूल असल्याने वादळ काहीकाळ आपली शक्ती कायम ठेवेल आणि २१ तासांनंतर तटस्थ होईल व त्यानंतर प्रतिकूल होईल.

सध्या समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सुमारे २७-२८ अंश सेल्सिअस इतके असून चक्रीवादळास अनुकूल आहे आणि मात्र ते लवकरच २६ अंश तापमान असलेल्या थंड पाण्यात येईल.

जमिनीवर धडकण्याच्यावेळी वादळामुळे जोरदार पाऊस आणि किनारपट्टीवर जोरदार वारा वाहण्याची शक्यता असून आणि काही भागात पूर येण्याची शक्यता आहे. चक्रीवादळ सायंकाळी ७ वाजता किनारपट्टी पार करेल व कमकुवत होईल त्यामुळे त्याचा परिणाम फार काळ होणार नाही.

यावर्षी अरबी समुद्रात आठवे चक्रीवादळ निर्माण झाल्याने १९७६ आणि १९८७ साली नोंदवलेल्या एका वर्षात आठ चक्रीवादळांच्या विक्रमाची बरोबरी झाली.

Image Credits – The Weather Channel 

Any information taken from here should be credited to Skymet Weather






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try