चक्रीवादळ ओखी सध्या दक्षिण भारताच्या कक्षेतून बाहेर पडला आहे . सध्या तो मुंबईच्या दक्षिण नैऋत्य भागात ६९० किमी अंतरावर आहे आणि सुरतच्या दक्षिण नैऋत्य भागात ८७० किमी अंतरावर आहे . ओखी चक्रीवादळ येत्या ६ ते ८ तासांत उत्तर आग्नेय दिशेस मार्गक्रमण करेल, तेथून ते उत्तर ईशान्य दिशेला गुजरात कडे मार्गक्रमण करेल.
कोंकण आणि गोवा भागात सध्या ढगाळ वातावरण असून ; मुंबई, रायगड, ठाणे डहाणू, नंदुरबार, धुळे, जळगाव ह्या भागात आज रात्रीपासून हलक्या पावसाच्या सरींचा अंदाज आहे. दि ५ डिसेंबरला या भयंकर ओखी चक्री वादळाची तीव्रता कमी होईल. या दरम्यान उत्तर महाराष्ट्रात पावसाची तीव्रता वाढेल. तसेच पुणे शहरात सुद्धा हलक्या पावसाचा अंदाज आहे.
दि. ५ आणि ६ डिसेंबर ला अरबी समुद्र खवळलेला असेल. वाऱ्याचा वेग ४० ते ६०किमी प्रती तास इतका राहील.
[yuzo_related]
उत्तर कोंकण आणि गोवा भागात या पावसामुळे परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे किनारी भागात राहणाऱ्या रहिवाशांनी आणि मच्छीमारांनी समुद्रात जावू नये.
Click here to check the Live Lightning and Thunderstorm status over Maharashtra
ओखी वादळ गुजरातच्या किनारी भागात प्रवेश करून संपुष्टात येईल आणि वातावरण पूर्वपदापवार येईल.
Image credit: Lokaso
येथून घेतलेल्या कोणत्याही माहितीकरिता skymetweather.com चा संदर्भ देणे अनिवार्य आहे