[Marathi] चक्रीवादळ महा गुजरात आणि महाराष्ट्राकडे वळण्याची शक्यता

November 3, 2019 12:25 PM | Skymet Weather Team

तीव्र चक्रीवादळ महा भारतीय किनाऱ्यापासून दूर नैऋत्य दिशेने जात आहे. आज सायंकाळपर्यंत तीव्रतेत वाढ होऊन चक्रीवादळ अति तीव्र होण्याची शक्यता आहे. उद्या संध्याकाळपर्यंत चक्रीवादळ भारताकडे वळण्याची शक्यता असून पूर्व-ईशान्य दिशेने दक्षिण गुजरात आणि उत्तर महाराष्ट्र किनाऱ्याकडे वळण्याची अपेक्षा आहे.

तीव्र चक्रीवादळ महा मागील ६ तासांत १४ किमी प्रति तासाच्या वेगाने पश्चिम-वायव्य दिशेने सरकले आहे. २ नोव्हेंबर रोजी १७:३० वाजता ते अक्षांश १७ अंश उत्तर आणि ६७.३ अंश पूर्वेस होते. भौगोलिकदृष्ट्या हे वेरावळच्या दक्षिण-नैऋत्येकडे ५२० किमी आणि दीवच्या ५४० किमी दक्षिण-नैऋत्येकडे आहे.

सध्याच्या हवामान प्रारूपांच्या अनुसार, थंड तापमान असलेला समुद्राचा पृष्ठभाग तसेच वातावरणातील दोन थरातील वाऱ्यांच्या वेगातील तफावत मध्यम राहण्याची शक्यता असल्याने चक्रीवादळ वक्र झाल्यानंतर कमकुवत होण्यास सुरवात होईल. तर, ५ नोव्हेंबरपर्यंत पुन्हा एकदा तीव्र चक्रीवादळाच्या रूपात कमकुवत होईल. त्यानंतर, हे आणखी कमकुवत होईल आणि किनाऱ्यावर पोहोचण्यापूर्वी चक्रीवादळ होईल. चक्रीवादळ जमिनीवर पोहोचण्याच्या वेळेस तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यामध्ये रूपांतरित होण्याची शक्यता आहे.

हे चक्रीवादळ ६ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी किंवा ७ नोव्हेंबरला सकाळच्या सुमारास दक्षिण गुजरात किनाऱ्यावर पोहोचेल अशी अपेक्षा आहे. गुजरातच्या जमिनीवर पोहोचण्याच्या वेळेस ते चक्रीवादळ किंवा कमी दाबाच्या पट्ट्याच्या स्वरूपात असेल असा अंदाज वर्तविला जात आहे. चक्रीवादळ म्हणून जर हि प्रणाली जमिनीवर आली तर अत्यंत खवळलेला समुद्र आणि मुसळधार पावसामुळे त्याचा परिणाम अधिकच वाईट असेल.

एक गोष्ट नक्कीच आहे की जेव्हा हि प्रणाली एखादे चक्रीवादळ किंवा कमी दाबाचा पट्टा म्हणून गुजरात किनारपट्टीला धडकेल तेव्हा जोरदार वारे आणि समुद्रात प्रचंड लाटा उसळण्याची शक्यता आहे. वाऱ्यांचा वेग ७०-८० किमी प्रति तासापर्यंत पोहोचू शकतो. लाटांची उंची देखील जास्त असेल. ज्यामुळे संभाव्य नुकसान अपेक्षित आहे. चक्रीवादळाचा मार्ग काळानुसार स्पष्ट होत जाईल तसे स्कायमेट परिणामाचे अचूक क्षेत्र तसेच तीव्रता याबद्दल अद्ययावत माहिती पुरवत राहील.

Image Credits – Business Line 

Any information taken from here should be credited to Skymet Weather

OTHER LATEST STORIES