वायव्य दिशेने किनाऱ्यापासून आणखी दूर गेले असले तरी,महाराष्ट्रावर चक्रीवादळ महा चा प्रभावअजूनही संपलेला नाही. स्कायमेटने येत्या २४ तासांत राज्यात जोरदार वारे आणि खवळलेल्या समुद्रासह पावसाचा अंदाज वर्तविला आहे.
आमच्या ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञांच्या अनुसारचक्रीवादळ महा तीव्र चक्रीवादळ बनले आहे.१ नोव्हेंबर रोजी सकाळी ५:३० वाजता, ते अक्षांश १४.६ उत्तर आणि रेखांश ७१.७ पूर्वेस स्थित होते. ही प्रणाली वायव्य दिशेने किनाऱ्यापासून आणखी पुढे दूर जाईल. तथापि, चक्रीवादळाच्या बाह्य परिघाचा विस्तार कोकण आणि गोवा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही भागांपर्यंत राहील.
परिणामी, येत्या २४ ते ३६ तासांत दोन्ही हवामान विभागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडेल. प्रामुख्याने रत्नागिरी, सांगली, सातारा आणि वेंगुर्ला यासारख्या ठिकाणी या गतिविधी अनुभवल्या जातील. मागील २४ तासात या प्रणालीच्या प्रभावामुळे विखुरलेला पाऊस झाला असून, सांगलीत ३ मिमी आणि वेंगुर्ला येथे १ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
या चक्रीवादळाचा प्रभाव मुंबईवर देखील पावसाच्या स्वरूपात दिसून येईल. येत्या २४ तासांत मुंबईत हलक्या सरींची शक्यता आहे.
हि प्रणाली मुसळधार पावसास कारणीभूत नसली तरी, येत्या ४८ तासांत जोरदार वारा आणि खवळलेल्या समुद्राच्या परिस्थितीमुळे त्याचा परिणाम दक्षिण व उत्तर कोकण किनारपट्टीवर दिसून येईल. म्हणूनच, पुढील दोन दिवस समुद्रात न जाण्याचा सल्ला मच्छिमारांना देण्यात येत आहे.
राज्याच्या अंतर्गत भागाविषयी सांगायचे तर विदर्भात हलक्या पावसाची शक्यता असून मराठवाड्यात पुढील दोन ते तीन दिवसांत एक किंवा दोन मध्यम सरींची शक्यता आहे.
कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्यात ऑक्टोबर मध्ये चांगला पाऊस झाल्यामुळे महिना मोठ्या अधिशेषासह संपला. मात्र विदर्भात पावसाची तूट राहिली असून सरासरीच्या ९% टक्के (सामान्य श्रेणीत असली तरी) कमी पाऊस झाला.
Image Credits – India Today
Any information taken from here should be credited to Skymet Weather