साधारण २४ ऑक्टोबरपासून पुणे शहरात काही तीव्र सरींसह कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरूच आहे. तथापि, गेल्या २४ तासांत हवामान प्रामुख्याने कोरडेच राहिले आहे.
आमच्या हवामानशास्त्रज्ञांच्या अनुसार उद्या संध्याकाळपर्यंत चक्रीवादळ महा-ईशान्य दिशेने पुन्हा वळण्याची शक्यता असल्याने येत्या काही दिवसात पुण्यात पाऊस परतण्याची शक्यता आहे. या गतिविधींचा परिणाम म्हणून ५ आणि ६ नोव्हेंबरला पुणे आणि आसपासच्या भागात चांगला पाऊस पडण्याची अपेक्षा आहे. या काळात एक-दोन तीव्र सरींची शक्यता असून ४ नोव्हेंबरला हलक्या सरींची शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान ७ नोव्हेंबरनंतर पावसाळी गतिविधी कमी होतील आणि हवामान कोरडे होण्याची शक्यता आहे. शिवाय, नंतर कोणत्याही लक्षणीय पावसाळी गतिविधींची शक्यता नाही.
या संपूर्ण काळात हवामान आल्हाददायक राहील. तापमानही कमी होण्यास सुरुवात होईल आणि नोव्हेंबरच्या दुसर्या आठवड्यात महाराष्ट्रात हिवाळा सुरू होईल असे आपण म्हणू शकतो.
चक्रीवादळ महा च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्यात चांगला पाऊस झाला आहे. खरं तर, फक्त किनारपट्टीवरील भागच नव्हे तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या अंतर्गत भागांतही पावसाळी गतिविधींची नोंद झाली आहे.
Image Credits – National Herald
Any information taken from here should be credited to Skymet Weather