[Marathi] नोव्हेंबरच्या पहिल्या चार दिवसात पुण्यात विक्रमी पाऊस, चक्रीवादळ माह अजून पाऊस देणार

November 5, 2019 12:44 PM | Skymet Weather Team

महाराष्ट्रात पुणे हे एकमेव शहर आहे जिथे हवामान प्रामुख्याने कोरडे राहण्याचे तीन दिवस वगळता १९ ऑक्टोबरपासून पाऊस सुरु आहे. नोव्हेंबर महिन्यात विक्रमी पावसाची नोंद शहरात झाली असून सरासरी ३०.१ मिमीच्या तुलनेत पहिल्या चार दिवसांतच ८५ मिमी इतका पाऊस पडला आहे. गेल्या ४८ तासांत शहरात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून २१ तासांच्या कालावधीत ३१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. स्कायमेटच्या अनुसार गेल्या अनेक दिवसांपासून लागोपाठ आलेले चक्रीवादळ पुण्याच्या हवामानावर परिणाम करीत आहे. प्रथम क्यार आणि आता चक्रीवादळ माहा जे चांगल्या पावसाला जबाबदार आहेत.

येत्या दोन ते तीन दिवसांत शहरात व लगतच्या भागात पाऊस सुरु राहण्याची अपेक्षा असल्याने हा कल सुरूच राहण्याची शक्यता आहे. चक्रीवादळ माहा गुजरातची किनारपट्टी ओलांडत असताना, ५ ते ७ नोव्हेंबर दरम्यान काही तीव्र सरींसह हलका ते मध्यम पाऊस पुण्यासह महाराष्ट्रातील बर्‍याच भागात हजेरी लावण्याची शक्यता आहे. त्यानंतर, त्याचा परिणाम कमी होण्यास सुरवात होईल, त्याचप्रमाणे मध्य-महाराष्ट्रात देखील पावसाचे प्रमाण कमी होईल.

पावसाच्या बाबतीत पुण्यासाठी हे अपवादात्मक वर्ष आहे. वर्षाच्या या काळात शहरात क्वचितच पाऊस अनुभवल्या जातो पण यावर्षी शहरात सातत्याने पावसाची नोंद होत असून त्याचे कारण पूर्णपणे अरबी समुद्रातील विकसित होणाऱ्या हवामान प्रणालींना दिले जाऊ शकते.

 Image Credits – NDTV 

Any information taken from here should be credited to Skymet Weather

OTHER LATEST STORIES