मध्य-पूर्व आणि लगतच्या पश्चिम मध्य अरबी समुद्रावर असलेले अत्यंत तीव्र चक्रीवादळ माहा उत्तर/ वायव्य दिशेने सरकले आहे. ४ नोव्हेंबर रोजी, २०:३० वाजता, हे अक्षांश १९.२ अंश उत्तर आणि रेखांश ६३.९ अंश पूर्वेस असून, गुजरातमधील वेरावळच्या ७०० किमी पश्चिम / नैऋत्य, दीवच्या ७५० किमी पश्चिम / नैऋत्य आणि पोरबंदरच्या ६६० किमी पश्चिम / नैऋत्य दिशेला आहे.
आमच्या हवामानशास्त्रज्ञांच्या अनुसार चक्रीवादळाची तीव्रता आणखी १२ तास अबाधित राहील आणि त्यानंतर कमकुवत होईल. पुढच्या १२ तासांत ते उत्तर दिशेने वाटचाल करत राहील आणि त्यानंतर वेगात वाढ होवून पूर्वेकडे / ईशान्य दिशेने वेगाने पुढे जाण्यास सुरवात करेल.
या मार्गाचा अवलंब केल्यानंतर ७ नोव्हेंबरच्या आसपास चक्रीवादळ गुजरातच्या किनाऱ्याला दीव ते पोरबंदर दरम्यान धडकण्याची शक्यता आहे. या काळात हि प्रणाली ८०-९० किमी प्रतितासचा वेग कायम ठेवेल आणि हा प्रदेश ओलांडताना १०० किमी प्रतितास वेगाने वाहण्याची अपेक्षा आहे.
या प्रणालीच्या प्रभावामुळे ६ नोव्हेंबरला सौराष्ट्र आणि गुजरात मध्ये काही मुसळधार सरींसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. खरं तर, विखुरलेला हलका पाऊस ५ नोव्हेंबरपासून सुरू होईल आणि जोर हळूहळू वाढेल. जुनागढ़, गिर सोमनाथ, अमरेली, भावनगर, सूरत, भरुच, आणंद, अहमदाबाद, बोटाड, पोरबंदर, राजकोट या ठिकाणी या गतिविधी प्रामुख्याने अनुभवल्या जातील. दरम्यान, भावनगर, सूरत, भरुच, आणंद, अहमदाबाद, बोटाड, वडोदरा येथे ७ नोव्हेंबरला मुसळधार पावसाची शक्यता आहे. या पावसाळी गतिविधींसोबत ४०-५० किमी प्रतितास वेगाने वारे देखील वाहण्याची अपेक्षा आहे.
चक्रीवादळ माहाच्या प्रभावामुळे उत्तर मध्य-महाराष्ट्र आणि उत्तर कोकणात ६ आणि ७ नोव्हेंबर रोजी काही तीव्र सरींसह हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या किनारीभागात ६ नोव्हेंबरच्या सकाळपासून ४०-५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
दरम्यान, गुजरात आणि उत्तर महाराष्ट्र किनारपट्टीवर आणि समुद्र खवळलेला राहण्याची अपेक्षा आहे आणि म्हणून मच्छीमारांनी ५ ते ७ नोव्हेंबर दरम्यान समुद्रात जाऊ नये असा सल्ला देण्यात येत आहे.
Image Credits – The Indian Express
Any information taken from here should be credited to Skymet Weather