[Marathi] महा च्या प्रभावामुळे नोव्हेंबर मध्ये मुंबईत दुर्मिळ पाऊस

November 8, 2019 11:40 AM | Skymet Weather Team

मुंबईच्या बर्‍याच भागात काल रात्री पाऊस झालेला असून सकाळपासून परत पावसाला सुरूवात झालेली आहे. किंबहुना शहरातील अनेक भागात जोरदार सरी बरसत आहेत.

हवामानतज्ञांच्या अनुसार, आजही शहरातील काही भागात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. तथापि, उद्यापर्यंत हवामान स्वच्छ होईल आणि आशा आहे की बराच काळ असेच वातावरण राहील.

चक्रीवादळ "महा" च्या मागे उरलेल्या प्रभावाला या पावसाळी गतिविधींचे श्रेय देण्यात येत आहे. ही प्रणाली आता कमी दाबाच्या क्षेत्रामध्ये कमकुवत झाली आहे आणि सध्या कोकण आणि दक्षिण गुजरात किनारपट्टीवरील कॅम्बेच्या आखातावर आहे. ही प्रणाली आणखी कमकुवत होण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे पावसाळी गतिविधी देखील कमी होतील.

यावर्षी पावसाने मुंबईकरांची चांगलीच दमछाक केली आहे. यावेळी मुंबई शहरात विक्रमी पाऊस झाला आहे. खरं तर, नोव्हेंबर महिन्यातही, पावसाळी गतिविधी सुरूच आहेत.

आज पावसाची आकडेवारी आल्यानंतर मुंबईतला नोव्हेंबर २०१० च्या ४७.२ मिमी पावसाचा विक्रम निश्चितच मोडला जाईल. या महिन्यात आतापर्यंत शहरात ४६ मिमी पावसाची नोंद झाली आहे जी २०१० नंतर नोव्हेंबरमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद आहे.

Image Credits – Mumbai Live 

Any information taken from here should be credited to Skymet Weather

OTHER LATEST STORIES