[Marathi] चक्रीवादळ क्यार च्या प्रकोपातून पुणे बचावले, ढगाळ वातावरणासह आल्हाददायक हवामान

October 25, 2019 4:52 PM | Skymet Weather Team

गेल्या तीन दिवसांपासून पुण्यात हलक्या सरी कोसळत असून चक्रीवादळ क्यार देखील हळूहळू पश्चिमेकडे सरकले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत मध्य महाराष्ट्रात सुरु असलेला पाऊस कमी होईल. तथापि, पुण्याच्या काही भागात २६ ऑक्टोबरपर्यंत एक किंवा दोन तीव्र सरींची शक्यता आहे. गेल्या २४ तासात पुण्यात ३.८ मिमी पावसाची नोंद झाली.

ऐन दिवाळीच्या दिवसही म्हणजे २७ ऑक्टोबरला काही भागांत हलक्या पावसाची शक्यता आहे. तथापि, मुसळधार पावसाची शक्यता नसून आल्हाददायक हवामान कायम राहील.

आमच्या तज्ञांच्या मते, दिवसाचे तापमान सुमारे ३० अंश असेल तर रात्रीचे तापमान २० अंशांच्या आसपास असेल. मात्र २७ ऑक्टोबरपर्यंत ढगाळ वातावरण कायम राहील.

नुकताच २०-२२ ऑक्टोबर दरम्यान मध्यम ते मुसळधार पाऊस झाला पण खरं तर पुण्यात ऑक्टोबर महिन्यात पाऊस नसतो. ऑक्टोबर महिन्यात पुण्यात सरासरी ७७.९ मिमी होतो पण यावर्षी तब्बल २०८ मिमी पावसाची नोंद आधीच झाली आहे, जे सरासरीच्या तुलनेत जवळपास तिप्पट आहे. पुण्यासाठी हा अपवादात्मक पावसाचा महिना आहे. गेल्या वर्षी २०१८ मध्ये ऑक्टोबर महिन्यात ३६० मिमी पावसाची नोंद झाली होती.

गेल्या दशकात साधारण मासिक सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस पडला आहे. गेल्या दशकात २६ मिमी इतका सर्वात कमी पाऊस २०१६ मध्ये नोंदविला गेला होता तर ऑक्टोबर २०१० मध्ये २६३ मिमी पाऊस झाला होता.

Image Credits – The Indian Express 

Any information taken from here should be credited to Skymet Weather

OTHER LATEST STORIES