सध्या महाराष्ट्राचे हवामान दोन प्रमुख हवामान प्रणालींमुळे प्रभावित होत आहे. एक म्हणजे अरबी समुद्रामधील चक्रीवादळ क्यार आणि दुसरे ओडिशा किनारपट्टीवरील कमी दाबाचे क्षेत्र. तसेच चक्रीवादळापासून महाराष्ट्रापर्यंत वातावरणातील वरच्या ठरत एक ट्रफ रेषा विस्तारत आहे.
या सर्वांच्या संयुक्त परिणामामुळे आज रात्रीपर्यंत कोकण आणि गोव्यात एक-दोन मुसळधार सरी पडतील. दरम्यान, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
प्रामुख्याने पणजी, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड येथे पावसाळी गतिविधी अनुभवल्या जातील. तसेच पुढील दोन दिवस मुंबईत तुरळक हलक्या सरींची शक्यता आहे.
दक्षिण कोकण आणि गोव्यातील काही भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. स्कायमेटकडे उपलब्ध पावसाच्या आकडेवारीनुसार, २४ तासांत पणजीमध्ये १५२ मिमी व वेंगुर्ला येथे ७० मिमी पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान आज पहाटे विदर्भात काही ठिकाणी एक दोन तीव्र सरी अनुभवल्या गेल्यात.
हवामानातज्ञांच्या अनुसार, चक्रीवादळ वादळ क्यार पश्चिम दिशेने मार्गक्रमण करेल आणि त्यामुळे उद्यापासून कोकण आणि गोव्यात पावसाचा जोर कमी होईल.
त्याचप्रमाणे मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही पावसाचा जोर कमी होईल आणि २४ तासानंतर केवळ हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
दिवाळीच्या संध्याकाळी महाराष्ट्राच्या बर्याच भागात काही मध्यम सरी पडण्याची शक्यता आहे. तथापि, पावसाचा जोर खूप कमी राहील त्यामुळे कोणताही अडथळा उद्भवण्याची शक्यता नाही.
Image Credits – The Financial Express
Any information taken from here should be credited to Skymet Weather