मध्य-पूर्व अरबी समुद्रावरील तीव्र कमी दाबाचा पट्टा सुमारे ४ ते ५ किमी प्रतितास वेगाने उत्तरेकडे वाटचाल करत आहे. आज, पहाटे साडेपाच वाजता, तीव्र कमी दाबाच्या पट्ट्याचेचक्रीवादळ 'क्यार'मध्ये रूपांतरण झाले आहे.
सध्या, हि प्रणाली १६ अक्षांश उत्तरेस आणि ७१.३ रेखांश पूर्वेस असून रत्नागिरी पासून सुमारे २४० कि.मी. पश्चिम-नैऋत्य दिशेस, मुंबईच्या दक्षिण-नैऋत्येकडे ३८० किमी आणि सलालाह (ओमान) च्या पूर्वे-दक्षिणपूर्व दिशेस १८५० किमी अंतरावर आहे.
आता हळूहळू चक्रीवादळ वायव्य दिशेने आगेकूच करेल आणि ओमान किनारपट्टीकडे जात असताना पश्चिम-वायव्य दिशेकडे सरकेल. आज रात्रीपर्यंत चक्रीवादळाच्या तीव्रतेत वाढ होऊन ते ‘तीव्र चक्रीवादळ’ होण्याची अपेक्षा आहे.
शिवाय, हे चक्रीवादळ उष्ण समुद्राच्या पृष्ठभागावरून प्रवास करीत असून समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सुमारे २९-३० अंश सेल्सिअस इतके आहे. म्हणूनच, २६ ऑक्टोबर रोजी संध्याकाळपर्यंत हि प्रणाली अति तीव्र चक्रीवादळात रूपांतरित होण्याची शक्यता आहे.
ही हवामान प्रणाली किनारपट्टीपासून दूर जाणे अपेक्षित असल्याने भारतीय किनाऱ्यावरील तिचा परिणामही हळूहळू कमी होईल. पुढील २४ तासांत कर्नाटकच्या उत्तर-किनारपट्टी तसेच कोकण आणि गोवा येथे काही तीव्र सरींसह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
उद्या पावसाचा जोर कमी होईल आणि या भागांत विखुरलेला पाऊस पडण्याची शक्यता आहे.उत्तर कर्नाटक तसेच कोकण आणि गोवा येथे २७ ऑक्टोबरपर्यंत जोरदार वारे आणि समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता आहे.पुढील २४ ते ४८ तास समुद्र खवळलेला राहील. म्हणूनच, मच्छीमार बांधवांना आणि सामान्य जनतेस पुढील २४ तास समुद्रात प्रवास न करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
Image Credits – The Financial Express
Any information taken from here should be credited to Skymet Weather