Skymet weather

[Marathi] चक्रीवादळ फनी मुळे महाराष्ट्रात २ मे नंतर उष्णतेची लाट कमी होणार

May 1, 2019 5:46 PM |

Maharashtra weather

मागील १२ आणि १७ एप्रिल दरम्यान झालेल्या विखुरलेल्या व गडगडाटी पावसानंतर, महाराष्ट्रातील हवामान पूर्णपणे कोरडेच आहे. याबरोबरच, विदर्भासह मराठवाड्यातील बहुतेक भागांमध्ये तापमानाचा पारा ४० अंशापेक्षा जास्त असल्याने वातावरण उष्ण आणि असह्य झालेले आहे.

विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये कोरड्या हवामानामुळे तीव्र उष्णतेची लाट निर्माण झाली आहे, ज्यामुळे कमाल तापमान ४५ अंशाच्या आसपास आहे. दरम्यान, पुण्यात देखील हंगामातील सर्वोच्च तापमान नोंदले गेले. मंगळवारी ब्रह्मपुरी येथे सर्वाधिक तापमान ४७. ०८ अंश सेल्सियस नोंदले गेले, त्याखालोखाल चंद्रपूर ४६.४१, नागपूर ४६.३, परभणी ४६.११, वर्धा ४५.९, तर अकोला आणि अमरावती येथे ४५.२ अंश तापमान नोंदले गेले.

Read in English: Extremely Severe Cyclone Fani to abate heat wave from Maharashtra by May 2

पुढील २४ तासांत महाराष्ट्रातील हवामानात कोणत्याही बदलाची अपेक्षा नाही. तथापि, अत्यंत तीव्र चक्रीवादळ फनी तटाच्या जवळ बंगालच्या खाडीत पश्चिम-मध्य आणि आसपासच्या दक्षिणपश्चिम खाडीत प्रवास करत आहे. हवामानतज्ञांच्या मते, अशी मजबूत प्रणाली शेकडो किलोमीटर दूर असलेल्या क्षेत्रांवरील वाऱ्याला नियंत्रित करते. त्याचप्रमाणे, फनी चक्रीवादळ वादळ उत्तर आंध्रप्रदेशच्या किनाऱ्याजवळ २ मे पर्यंत पोहोचेल याकाळात महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये ढगाळ वातावरण राहील.

खरं तर, वाऱ्याच्या दिशेत बदल अपेक्षित असून सध्या उत्तर-पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांची दिशा बदलून दक्षिण-पश्चिम होईल. दरम्यान वाऱ्याच्या दिशेत बदल तसेच ढगाळ वातावरणामुळे तापमान कमी होण्याची शक्यता आहे आणि महाराष्ट्रातील बहुतेक भागांमधून उष्णतेची लाट कमी होण्याची अपेक्षा आहे. परंतु, विदर्भातील एक-दोन ठिकाणी उष्णतेची लाट कायम राहू शकते.

खरं तर, उष्णतेच्या लाटेची परिस्थिती निवळली असली तरी राज्यातील कमाल तापमान जास्तच असेल आणि हवामानाची स्थिती उष्ण राहिल.

प्रतिमा क्रेडिट्स: पिंटरेस्ट

येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try