[Marathi] उत्तरेकडील डोंगराळ भागात शीतलहर, मध्य भारतात अवकाळी पाऊस, ईशान्य मान्सून या आठवड्यात कमकुवत राहणार असून चेन्नईत पावसाची तूट वाढणार, दिल्ली एनसीआर मध्ये प्रदूषण मध्यम श्रेणीत

December 18, 2019 10:00 AM | Skymet Weather Team

मागील आठवड्याच्या उत्तरार्धात उत्तरेकडील पर्वतरांगामध्ये जोरदार बर्फवृष्टी आणि मैदानी भागांत व्यापक पाऊस पडला, उत्तर प्रदेश, झारखंड आणि बिहारपर्यंत या गतिविधींनी मजल मारली. काही ठिकाणी गारपिटीसह पावसाने हजेरी लावली आणि मैदानी भागातील काही ठिकाणी दिवसा देखील थंडीची परिस्थिती निर्माण झाली.

स्कायमेटच्या अचूक अंदाजानुसार, ईशान्य मान्सून कमकुवत राहिला ज्यामुळे पाचही उपविभागात आठवड्यात पावसाची तूट राहिली. महाराष्ट्रासह मध्यप्रदेशात काही ठिकाणी अवकाळी पाऊस झाला.

पश्चिमी विक्षोभाच्या पार्श्वभूमीवर, सकाळी उत्तरेकडील मैदानी भागांमध्ये थंडी व धुके पडेल आणि किमान तापमान एक अंकीच राहील. डोंगराळ भागात शीतलहर कायम राहण्याची अपेक्षा आहे. १९ तारखेच्या आसपास एक नवीन प्रणाली विकसित होईल ज्यामुळे डोंगररांगांमध्ये मध्यम बर्फवृष्टी आणि पाऊस पडण्याची शक्यता आहे. पायथ्याशी असलेल्या पंजाब, हरियाणा आणि राजस्थानच्या काही भागांवरही याचा परिणाम होईल.

मागील आठवड्याच्या शेवटच्या काही दिवसांच्या अनुषंगाने महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडच्या काही भागांमध्ये या आठवड्याच्या पहिल्या दोन दिवसांत अवकाळी पावसाची नोंद होईल. काही ठिकाणी गारपीट होण्याची देखील शक्यता आहे. तापमानात किंचित घट नोंदविण्यासहित या ठिकाणी उर्वरित आठवड्यात आल्हादायक हवामान अनुभवायला मिळेल.

बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये किमान तापमानात घट होऊन सकाळी थंडी व धुकं अनुभवले जाईल. मेघगर्जनेसह हलका पाऊस अरुणाचल प्रदेश आणि आसामच्या वरच्या भागापुरता मर्यादित राहील. उर्वरित पूर्व आणि ईशान्य भारत कोणत्याही लक्षणीय हवामान विषयक गतिविधी पासून मुक्त असेल.

या आठवड्यात कमकुवत ईशान्य मान्सूनची परिस्थिती कायम राहील. सलग दुसर्‍या आठवड्यात पावसाची तूट राहण्याची शक्यता आहे. हलक्या पावसाळी गतिविधी अत्यंत दक्षिणेकडील भाग आणि तमिळनाडू किनारपट्टीपर्यंत मर्यादित राहतील. सध्या चेन्नईमध्ये ईशान्य मान्सूनची तूट सुमारे १७% आहे जी वाढून २०% च्या पलीकडे जाईल.

या आठवड्यात दिल्ली एनसीआरमध्ये प्रदूषण स्तर मध्यम पातळीवर

पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि दिल्लीच्या काही भागात सक्रिय पावसाळी परिस्थितीमुळे प्रदूषण अत्यंत निकृष्ट-गंभीर प्रवर्गातून खाली आले. या पावसामुळे प्रदूषक धुवून निघाले आहे, तथापि दिल्लीतील हवेची गुणवत्ता बर्‍याच ठिकाणी मध्यम श्रेणीत कायम राहिली आहे. आठवड्याच्या पूर्वार्धात हि परिस्थिती कायम राहील अशी अपेक्षा आहे. त्यानंतर, हलके धुके तयार होण्यामुळे हवेची गुणवत्ता किंचित खराब होईल. तथापि, या आठवड्यात प्रदूषणाची पातळी अत्यंत निकृष्ट-गंभीर श्रेणीत येण्याची अपेक्षा नाही. बर्‍याच ठिकाणी हवेची गुणवत्ता मध्यम श्रेणीत अनुभवली जाईल आणि केवळ काही ठिकाणी हवेची गुणवत्ता खराब श्रेणीत येईल.

Image Credits – The Indian Express 

Any information taken from here should be credited to Skymet Weather

OTHER LATEST STORIES