सध्या तीव्र चक्रीवादळ महा पूर्व-मध्य अरबी समुद्रावर आहे. आज ८:३० वाजता, अक्षांश १४.८ अंश उत्तर आणि रेखांश ७१ अंश पूर्वे जवळ, अमिनीदिवीच्या ४५० किमी वायव्य दिशेस, मंगळुरुच्या उत्तर / वायव्य आणि गोव्याच्या ३१० किमी दक्षिण / नैऋत्येकडे होते.
हवामान प्रारूपं असे दर्शवित आहेत की चक्रीवादळ पुढील काही तास वायव्य दिशेने जाईल आणि नंतर पश्चिम / वायव्य दिशेने पुन्हा वळेल आणि हळूहळू अत्यंत तीव्र चक्रीवादळ बनेल. आणखी दोन ते तीन दिवस ही परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.
ही प्रणाली अनुकूल हवामान परिस्थितीत म्हणजे २८ अंश सेल्सिअस तापमान असलेल्या उबदार समुद्राच्या पृष्ठभागावर व वातावरणातील दोन थरांच्या दरम्यान असलेल्या वाऱ्यांच्या वेगातील तफावत ५ ते १० नॉट्स असलेल्या वातावरणात प्रवास करीत आहे. पुढील दोन ते तीन दिवस अशा परिस्थितीत प्रवास होण्याची शक्यता आहे.
येत्या २४ ते ४८ तासांत ही प्रणाली कर्नाटकची उत्तर किनारपट्टी, दक्षिण कोकण आणि गोवा तसेच दक्षिण मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस देईल. उत्तर कोकण आणि गुजरातमध्ये विखुरलेला पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील ४८ तास कोकण आणि गुजरात किनारपट्टीवरील समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता आहे.
तसेच ४८ ते ७२ तासांनंतर महा २६ ते २७ अंश सेल्सिअस तापमान असेलेल्या थंड समुद्राच्या पृष्ठभागावर येईल. या परिस्थितींमुळे चक्रीवादळाच्या तीव्रतेवर आणखी मर्यादा येतील. ५ नोव्हेंबरच्या आसपास ही प्रणाली गुजरात किनाऱ्याकडे पूर्वोत्तर दिशेने वळेल.
Any information taken from here should be credited to Skymet Weather