जुलै आणि ऑगस्ट महिन्यात भारताच्या दक्षिणी द्वीपकल्पाच्या भागासह महाराष्ट्र आणि तेलंगाना येथे अगदीच कमी पाऊस झाल्याने तेथील पावसाच्या कमतरतेचे प्रमाण खूपच जास्त होते. दिनांक १ सप्टेंबरला उत्तर कर्नाटकातील पावसाची तुट ४३% होती, परंतु दिनांक १६ ते २२ सप्टेंबर दरम्यान चांगला पाऊस होऊन हे प्रमाण कमी होऊन २४% झाले आहे.
तसेच मराठवाड्यातील पावसाची कमतरताही ५१% वरून कमी होऊन ३६% झाली आहे. मध्य महाराष्ट्रातही दिनांक १ सप्टेंबरला पावसाची तुट ४१% होती परंतु गेल्या आठवड्यात झालेल्या चांगल्या पावसामुळे हे प्रमाण २८% झाले आहे.
रायलसीमा येथेही २०% पावसाची कमतरता होती पण आता ९% इतकीच आहे. तेलंगाणा येथेही दिनांक १ सप्टेंबरला पावसाच्या कमतरतेचे प्रमाण २५% होते आता मात्र १८% झाले आहे तसेच विदर्भातही १३% होते सध्यस्थितीत मात्र ८% झाले आहे
मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात गेल्या आठवड्यात चांगलाच पाऊस झाल्याचे वरील आकडेवारीवरून कळून येते. तसेच उत्तर कर्नाटकातही चांगला पाऊस झाला असल्याचे लक्षात येते.
क्षेत्रफ़ळाच्या विचार करता महाराष्ट्र हा फार मोठा भाग असल्याने तेथे झालेल्या भरपूर पावसामुळे संपूर्ण देशातील पावसाच्या आकडेवारीत मोठ्या प्रमाणात फरक पडतो.
सध्या सुरु असलेल्या पावसामुळे त्या भागातील पावसाची कमतरता भरपूर प्रमाणात भरून निघते आहे. द्वीपकल्पाच्या भागात दिनांक १ सप्टेंबरला पावसाच्या कमतरतेचे प्रमाण २१% होते आणि दिनांक २२ सप्टेंबर रोजी ते १५% झाले आहे. तसेच मध्य भारतातही १५% वरुन १३% झाले आहे.
कमी दाबाच्या क्षेत्राचे रुपांतर हे तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात झाले आणि ते छत्तीसगड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात वरून पुढे सरकले त्यामुळे या भागात आणि मध्य भारतात चांगला पाऊस झाला.
आता मध्य भारतातील वातावरणातील बदल हे कमी झालेले आहेत. तसेच बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आणि चक्रवाती अभिसरण यामुळे दक्षिणी द्विप्काल्पाच्या टोकाचा भाग म्हणजेच तामिळनाडू, दक्षिण कर्नाटकाचा भाग आणि केरळ येथे येत्या ४८ तासात चांगल्या पावसाची शक्यता आहे.
Image Credit: oneindia.com