बंगालचा उपसागर आता सक्रीय झाला असून त्यामुळे मान्सूनला पूरक हवामान प्रणाली तयार होत आहेत. या हवामान प्रणालींमध्ये मुख्यत्व्ये चक्रवाती अभिसरणाचा समावेश असून या प्रणाली भारताच्या मध्य भागाकडून गुजरात पर्यंत जात आहे. अश्याच एका हवामान प्रणालीमुळे गुजरातमध्ये याआधीही चांगला पाऊस होऊन गेला आहे. नेहमी या प्रणाली पश्चिमेकडे किंवा वायव्येकडे सरकत असतात.
अजूनही एक चक्रवाती अभिसरणाची प्रणाली तयार झाली असून ती सध्या झारखंड आणि छत्तीसगडवर आहे. याआधी बंगालच्या उपसागरात जी हवामान प्रणाली तयार झाली होती त्याचप्रमाणे हि हवामान प्रणालीही कार्यरत होईल असा अंदाज आहे. अशीच अजूनही एक प्रणाली तयार होताना दिसून आली असून येत्या काही दिवसात एकतर तिचे रुपांतर कमी दाबाच्या क्षेत्रात किंवा चक्रवाती अभिसरणात होईल असा अंदाज आहे.
या हवामान प्रणालीचा प्रभाव ओडिशा, छत्तीसगड, मध्यप्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात या भागांवर असेल.पुढच्या आठवड्यात विदर्भ, तेलंगाणा आणि मराठवाड्याच्या अगदीच पाऊस न झालेल्या भागात चांगलाच पाऊस होईल. तसेच राजस्थानच्या काही भागातही येत्या काही दिवसात भरपूर प्रमाणात पाऊस होणे अपेक्षित आहे.
येत्या काही दिवसात मध्य आणि पूर्व भारतात मान्सूनच्या पावसाची चांगलीच हजेरी लागेल. परंतु उत्तर भारतात आणि त्यातूनही सखल भागात मध्य आणि पूर्व भारतापेक्षा तुलनात्मक दृष्ट्या कमी पाऊस होईल.
Image Credit: flickr.com