Skymet weather

[Marathi] बंगालच्या खाडीतील चक्रीवादळ बुलबुल लवकरच तीव्र चक्रीवादळ होईल, ओडिशा आणि पश्चिम बंगालला दक्षतेचा इशारा

November 7, 2019 6:14 PM |

cyclone Bulbul

अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाच्या क्षेत्राचे अखेरीस गुरुवारी सकाळी बुलबुल चक्रीवादळ झाले. हे हंगामातील सातवे चक्रीवादळ आहे, तर मान्सूननंतरच्या मोसमात बंगालच्या उपसागरातील पहिले आहे.

ही प्रणाली सध्या बंगालच्या पूर्व खाडीवर असून अक्षांश १४.७ अंश उत्तर आणि रेखांश ९० अंश पूर्वेस केंद्रित आहे, ओडिशा ,पारादीपच्या दक्षिण-आग्नेय दिशेला ८८० किमी, पश्चिम बंगाल मधील सागर बेटांच्या दक्षिण-आग्नेय दिशेस ७७५ किमी, आणि खेपूपारा, दक्षिण बांग्लादेश पासून ८०० किमी दक्षिण-आग्नेय दिशेस आहे.

चक्रीवादळ बल्बुल उत्तर-वायव्य दिशेला अनुकूल हवामान परिस्थितीत आणि पुढील २४ तासांत तीव्र चक्रीवादळात रूपांतरित होईल. खरं तर, हि प्रणाली अति तीव्र चक्रीवादळ होण्याची शक्यता अधिक आहे. १० नोव्हेंबरच्या सुमारास चांदबली ते सागर बेट दरम्यान धडकण्याची शक्यता आहे.

हवामानतज्ञांच्या अनुसार, बुल्बुल पुन्हा वळण्यापूर्वी पुढील तीन दिवस समुद्रात राहील. त्यानंतर हे पूर्व किनारपट्टीकडे वळेल आणि शक्यतो उत्तर ओडिशा आणि पश्चिम बंगाल किनारपट्टीवर लगत राहील.

आतापर्यंत चक्रीवादळ बुलबुल आणि त्याच्या तीव्रतेचा मागोवा घेत असलेल्या जगातील विविध हवामान प्रारूपांमध्ये बरेचसे साम्य आहे. तथापि, त्याच्या जमिनीवर कुठे धडकेल याबद्दल मतभेद आहे. चला आपण यावर एक नजर टाकूयाः

weather-model-

हवामानतज्ञांच्या मते, पर्यावरणीय वैशिष्ट्ये अशी आहेत जी त्याच्या मार्गामध्ये बरीच अनिश्चितता आणते. तथापि, हवामानशास्त्र असे सूचित करते की वर्षाच्या या काळात बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीवादळ सामान्यतः पूर्वेकडे अर्थात बांगलादेश किंवा म्यानमारच्या दिशेने जाते. आमचा असा विश्वास आहे की बुलबुल बहुधा पश्चिम बंगाल किंवा बांग्लादेशात जाईल.

अतिवृष्टीचा इशारा:

७ नोव्हेंबर: सध्या बुलबुल किनारपट्टीपासून बरेच दूर आहे, परंतु अशा शक्तिशाली प्रणालीचा किनारपट्टीवरील हवामानावर परिणाम होतो. आज आपण ओडिशाचा उत्तर किनारी भाग आणि पश्चिम बंगालमध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. ताशी ५०-६० किमी वेगाच्या वाऱ्यासह पाऊस पडेल. तसेच, आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवरही हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

८ नोव्हेंबर: चक्रीवादळ बुलबुल जमिनीच्या जवळ सरकत असताना, तीव्रते वाढ होईल, पाऊस तसेच जमिनीलगत वारा देखील वेग पकडेल. उत्तर ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीच्या भागात काही मुसळधार सरींसह मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. वारे ७०-८० किलोमीटर प्रतितास वेगाने वाहतील.

९ आणि १० नोव्हेंबर: आता, बुलबुल भारतीय किनारपट्टीच्या तसेच वळण घेण्याच्या अगदी जवळ असेल. यामुळे त्याचा वेग कमी होईल, परिणामी दीर्घकाळ आणि मुसळधार पाऊस होईल. अशाप्रकारे, ९ आणि १० नोव्हेंबरला ओडिशाची उत्तर किनारपट्टी आणि पश्चिम बंगालमध्ये जोरदार ते अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. याकाळात ८०-९० किमी प्रतितास वेगाच्या क्षमतेचे वारे वाहण्याची शक्यता आहे.

पुन्हा एकदा सांगू इच्छितो की चांदबली, पुरी, गोपालपूर, बालासोर, डायमंड हार्बर, दिघा आणि कॅनिंग या ठिकाणांवर सर्वाधिक परिणाम होईल. खरं तर, बारीपाडा, मिदनापूर, कोलकाता, भुवनेश्वर यासारख्या भागातही मुसळधार पाऊस पडेल.

दरम्यान, पूर्व किनारपट्टीवर समुद्र खवळलेला राहील. ८-१० नोव्हेंबर दरम्यान ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर मच्छिमारांनी समुद्रात मासेमारीसाठी जाणे पूर्णपणे टाळावे असा इशारा देण्यात येत आहे.

03-Cyclone-Bulbul

 Image Credits – News Track English 

Any information taken from here should be credited to Skymet Weather






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try