[Marathi] बिहार पूरस्थिती: तब्बल १४० मिमी अति मुसळधार पावसामुळे पाटण्यातील जनजीवन विस्कळीत; आणखी पावसाची शक्यता

September 29, 2019 10:59 AM|

Bihar rains

गेल्या २४ तासांत बिहारमधील काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे.पाटणा, गया, भागलपूर या ठिकाणांना सर्वाधिक फटका बसला आहे.

स्कायमेटकडे उपलब्ध पावसाच्या आकडेवारीनुसार पटना येथे आज पहाटे साडेपाच वाजेपर्यंत १४० मिमी, गया येथे ८८ मिमी आणि भागलपूरमध्ये ८७ मिमी पावसाची नोंद झाली.

पुराचे पाणी घरांमध्ये, कार्यालये आणि दुकानांमध्ये घुसले असून आणि सर्वत्र नुकसान झाल्याचे दृश्य आहे.

डाक बंगला, राजेंद्र नगर, आणि एक्जिबिशन रोड यासारख्या प्रमुख भागांमध्ये पाणी साचले आहे आणि इतरही अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत. रस्ते, रुग्णालय आणि शैक्षणिक संस्था सर्वच पुराच्या पाण्याखाली आहेत.

राजधानी पाटणा शहरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. गंगा आणि बुढी गंडकसह बर्‍याच मोठ्या नद्यांमध्ये पाण्याची पातळी वाढली आहे.

पाटणा व इतर अनेक शहरांमध्ये मुसळधार पावसामुळे महापालिकेला अति दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

स्थानिकांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला असून आणि परिस्थिती गंभीर होण्याआधीच पूर्व तयारीत राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. यापूर्वीच एनडीआरएफच्या संघटना या भागात तैनात ठेवण्यात आल्या आहेत.

आपत्ती व्यवस्थापनाच्या अहवालानुसार राज्यातील जवळपास२३ जिल्ह्यांमध्ये बहुतांश नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत असल्याने पूर आला आहे. तसेच मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

स्कायमेटच्या हवामानशास्त्रज्ञांनी येत्या २४ तासांत राज्यात अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला असून राज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसामुळे आज पूरस्थिती उद्भवण्याचा संभव आहे.

उद्यापर्यंत काही भागात पाऊस थोडा कमी होवून परिस्थिती सुधारण्याची शक्यता आहे, तथापि, भागलपूर, पूर्णिया, किशनगंज आणि सुपौल या ईशान्य बिहारमधील ठिकाणी आणखी दोन दिवस मध्यम ते मुसळधार पावसाची अपेक्षा आहे.

Image Credits – The Indian Express 

Any information taken from here should be credited to Skymet Weather

Similar Articles

thumbnail image
March 20, Today Marks The Spring Equinox: Day-Night Duration Nearly Equal

The official transition from winter to spring, known as the SPRING EQUINOX, occurs today! It’s time when the Sun crosses the celestial equator precisely at 2:31 PM, delivering warmer, longer days to the Northern HemiSphere. As autumn arrives, the South enjoys colder evenings.

posted on:
thumbnail image
आज सूर्य करेगा भूमध्य रेखा पार, बसंत ऋतु की शुरुआत, दिन-रात की अवधि लगभग बराबर

आज, 20 मार्च 2025, बसंत विषुव (Spring Equinox 2025) का दिन है। सूर्य भूमध्य रेखा को पार करेगा, दिन बड़े और गर्म होंगे। उत्तर गोलार्ध में बसंत ऋतु की शुरुआत होगी, दक्षिण गोलार्ध में शरद ऋतु का आगमन होगा। वहीं, सितंबर में यह खगोलीय घटना फिर से होगी।

posted on:
thumbnail image
गर्मी का दायरा बढ़ा! ओडिशा, महाराष्ट्र, तेलंगाना और रायलसीमा में 40°C के पार तापमान, राहत की उम्मीद

देश में समय से पहले गर्मी असर बढ़ रहा है। ओडिशा, महाराष्ट्र, तेलंगाना, आंध्र प्रदेश में अभी तापमान से 40°C से ऊपर पहुंच गया है, जिस कारण इन राज्यों में भीषण गर्मी हो रही है। फरवरी 2025, पिछले 125 वर्षों में सबसे गर्म महीना रहा है। कई जगहों पर सामान्य से 6.4°C तक ज्यादा तापमान रिकॉर्ड हुआ है।

posted on:
thumbnail image
दिल्ली में बढ़ेगी गर्मी! शुष्क और तपता रहेगा वीकेंड, बारिश की संभावना हुई कम

दिल्ली में गर्मी बढ़ रही है, पिछले 3 दिनों में तापमान 4°C बढ़ा है। आज अधिकतम 34-35°C, न्यूनतम 17°C तक रह सकता है। मार्च अब तक लगभग शुष्क बना हुआ है, सिर्फ 2mm बारिश दर्ज हुई है। 26-28 मार्च को तापमान 40°C के करीब पहुंचने की संभावना है। वहीं,पश्चिमी विक्षोभ से मैदानी इलाकों में बारिश की संभावना नहीं है।

posted on: