[Marathi] राजस्थानमधील बारमेर मध्ये दशकानंतर नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पाऊस

November 14, 2019 4:08 PM | Skymet Weather Team

गेल्या २४ तासांत राजस्थानमधील बर्‍याच भागात अवकाळी पाऊस पडला. राजस्थानच्या नैऋत्य भागात मध्यम ते मुसळधार पावसाची नोंद झाली आहे, तर वायव्य भागातही विखुरलेला हलका पाऊस पडला.

स्कायमेटकडील उपलब्ध पावसाच्या आकडेवारीनुसार, चोवीस तासांच्या कालावधीत बारमेर येथे ५८ मिमी पावसाची नोंद झाली. हा गेल्या १० वर्षातील बारमेरमध्ये नोव्हेंबर महिन्यात नोंदवलेला सर्वाधिक पाऊस आहे. वस्तुतः गेल्या दशकात शहरात नोव्हेंबर महिन्यात क्वचितच पाऊस पडला असून सर्वसाधारणपणे नैऋत्य राजस्थानात कोरडे हवामान असते.

दरम्यान, फलोदी येथे ३० मिमी, तर जैसलमेर आणि बीकानेर येथे अनुक्रमे २ मिमी आणि १ मिमी पाऊस पडला. श्री गंगानगरमध्येही हलका पाऊस झाला.

उत्तर भारताच्या डोंगराळ भागातील पश्चिमी विक्षोभामुळे दक्षिण-पश्चिम राजस्थानातील प्रेरित चक्रीय परिभ्रमण हे बारमेरमधील पावसामागील प्रमुख कारण होते. शिवाय, दक्षिण आणि नैऋत्येकडील वारे राजस्थानला आर्द्रता पोहोचवत आहेत.

राजस्थानमध्ये मध्यम ते मुसळधार पावसासाठी या एकत्रित हवामान गतिविधी जबाबदार आहेत. उद्यापर्यंत बारमेर, जैसलमेर, जोधपूर आणि बीकानेर तसेच जलोरच्या काही भागात गडगडाटासह चांगल्या पावसाची अपेक्षा आहे.

त्यानंतर, पश्चिमी विक्षोभ, तसेच प्रेरित चक्रीय अभिसरण दूर जाईल. तसेच पश्चिमेकडून वारे वाहू लागल्याने अरबी समुद्रावरील येणारी आर्द्रता देखील कमी होईल.

राजस्थानचे हवामान १६ नोव्हेंबरपासून स्वच्छ होण्यास सुरवात होईल. दिवसाचे तापमान पुन्हा एकदा वाढेल. उत्तरेकडून थंड वारे सुरू झाल्यामुळे १६ आणि १७ नोव्हेंबरपासून किमान तापमानात दोन ते तीन अंशांनी घट होईल

Image Credits – Business Line 

Any information taken from here should be credited to Skymet Weather

OTHER LATEST STORIES