मान्सूनच्या काळात बंगरूळ शहराने छान आल्हाददायक वातावरण अनुभवले आहे. सर्वसाधारणपणे या शहरात जुलै महिन्यात सरासरी १०८.९ मिमी पाऊस होतो. सध्या ९१.३ मिमी पावसाची नोंद झालेली आहे. गेल्या २४ तासात शहरात ३.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
कर्नाटकाची राजधानी असलेल्या या शहराचे वातावरण सुसह्य होण्यासाठी दोन महत्वाच्या गोष्टी आहे, एक म्हणजे पाऊस आणि दुसरे म्हणजे शहराची समुद्रसपाटीपासूनची उंची. दिल्ली (४०९ फुट) आणि बंगरूळ (३०२० फुट) या शहरांच्या समुद्रसपाटीपासूनच्या उंचीची तुलना केल्यास त्यातला फरक लक्षात येतो. तसेच पाऊस आणि समुद्रसपाटीपासूनची उंची हे दोन घटक कसे एकमेकांना पूरक आहेत हे समजते कारण या दोन घटकांमुळे बंगरूळ शहराचे वातावरण साधरणपणे वर्षभर थंड असते.
या शहराने मान्सून काळात असह्य वातावरणावर मात केली जाते असे म्हणायला हरकत नाही. सकाळी सकाळी ढगाळ वातावरण हे बंगरूळ शहरात नेहमीचेच असते. तसेच या काळात वाहणाऱ्या हलक्याफुलक्या वाऱ्यांमुळे येथील नागरिकांना वेगळाच आनंद मिळतो. सर्वसाधारणपणे संध्याकाळी किंवा रात्री पाऊस होत असल्याने दिवसाचे तापमान तसे कमी असते.
पावसाळ्याच्या दृष्टीकोनातून बघता या शहरासाठी ऑगस्ट आणि सप्टेंबर हे महिने सर्वाधिक पावसाचे असतात. परंतु शहरात मे ते जुलै या काळातही मध्यम स्वरूपाचा पाऊस होतच असतो. यंदा मात्र जुलै महिन्याच्या पूर्वार्धात या शहरात तसा कमी पाऊस झाला आणि महिन्याचे पहिले दहा दिवस अक्षरशः कोरडेच गेले. परंतु गेल्या आठवड्यापासून सतत मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस सुरूच आहे. पण तरीही या वर्षी २४ तासाचा सर्वोच्च पावसाचा आकडा गाठण्यासाठी २६ मिमी पावसाची कमतरता आहे.
यावर्षी बंगरूळ शहर वगळता कर्नाटकातील जवजवळ सर्वच भागात फारसा पाऊस झालेला नाही. कर्नाटकच्या दक्षिणेकडील भागात चांगला पाऊस झाला आहे. तसेच कर्नाटकाच्या किनारपट्टीला मात्र २३ टक्के पावसाची कमतरता आहे आणि उत्तर कर्नाटकातील आतील भागातही पावसाची उणीव असून तेथेही -३८% पाऊस झाला आहे. याचबरोबर दक्षिण कर्नाटकच्या आतील भागात मात्र ५ % चांगला पाऊस झाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे बंगरूळ शहराचे तापमान सुसह्य झाले आहे. दिवसाचे कमाल तापमान २० अंश से. ते ३० अंश से. या दरम्यान असते.आणि किमान तापमान २० अंश से.च्या जवळपास असते. २५ जुलै ते २७ जुलै या काळात शहरात चांगलाच पाऊस होणे अपेक्षित आहे. आणि त्यानंतर काही दिवस मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरूच राहील.
Image Credit: The Hindu