Skymet weather

[Marathi] हिक्काने ओमान किनारपट्टी ओलांडली, कमकुवत होवून चक्रीवादळ आणि त्यानंतर लवकरच कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतरित होणार

September 25, 2019 3:35 PM |

Cyclone Hikka latest news

अरबी समुद्रात भरपूर वेळ घालवल्यानंतर चक्रीवादळ हिक्काने अति तीव्र चक्रीवादळ म्हणून ओमानच्या किनारपट्टीस सायंकाळी साडेआठच्या सुमारास डुकमच्या जवळ ओलांडले. या प्रणालीने ओमानमध्ये जोरदार पाऊस आणि वारा अनुभवण्यात आला याकाळात सुमारे १०० किमी प्रतितास वेगाने वारे वाहत होता.

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर, अतिवृष्टीमुळे अडकलेल्या सात जणांच्या कुटुंबाला ओमान वासियांच्या एका समुहाने वाचवले. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाली नाही. सर्वाधिक प्रभावित झालेल्या मसिराहमध्येही कोणतीही व्यक्ती किंवा गटाला निवाऱ्याची आवश्यकता नसून मालमत्तेचे कोणतेही नुकसान झाल्याची नोंद नाही.

जमिनीवर धडकल्यानंतर, हिक्का कमकुवत होऊन तीव्र चक्रीवादळ झाले आहे, त्यानंतर लवकरच चक्रीवादळात रूपांतरित होईल.

सकाळी, हि प्रणाली चक्रीवादळ म्हणून १९.६ अंश उत्तर, ५.९ अंश पूर्व आणि डुकमच्या पश्चिमेला १८० किमी वर स्थित आहे. साधारण आणखी ६ तासांनंतर, हिक्का कमकुवत होवून तीव्र कमी दाबाचा पट्टा बनेल आणि त्यानंतर पूर्वेकडे सरकताना कमकुवत होऊन कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतरित होईल.

किनारपट्टी ओलांडल्यानंतर, हिक्का जलदरीत्या कमकुवत होण्याच्या प्रक्रियेतून गेला कारण जमिनीवरील कोरडे वाऱ्यांनी वादळाच्या अभिसरणात प्रवेश करण्यास सुरुवात केली, म्हणूनच त्याची संरचना क्षय झाली. अशाप्रकारे, हि प्रणाली जमीनीत अंतर्गत भागाकडे सरकेल तशी कमकुवत होत जाईल. तथापि, या प्रणालीमुळे सौदी अरेबिया आणि येमेनमध्ये काही प्रमाणात पाऊस पडेल असा अंदाज आहे.

Image Credits – Prag News 

Any information taken from here should be credited to Skymet Weather






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try