मान्सूनच्या प्रभावामुळे गुरुवारी पुण्यात जोरदार पाऊस पडला आहे, कारण शहरात केवळ ९ तासांत ७१ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आलेली आहे. जून महिन्यात शहरातील सरासरी पावसाचे प्रमाण ११६.१ मिलीमीटरवर गेले आहे.
२६ जूनपर्यंत पुणे मध्ये फक्त ६०.७ मिमी पावसाची नोंद झाली होती. पण आज दुपारी जोरदार पावसाने पुण्यातील मासिक लक्ष्य गाठण्यास मदत केली आहे.
त्यानंतर पावसाचा जोर कमी झाला पण तीव्र ढग कायम राहिला. हवामानज्ञांच्या म्हणण्यानुसार, पुण्यातील तीव्र ढग कायम असल्यामुळे अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुण्यातील भागात येणाऱ्या २४ तासांपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाची अपेक्षा आम्ही करू शकतो. त्यानंतर, पावसाचे तीव्र प्रमाण कमी होईल परंतु विखुरलेला पाऊस सुरु राहील.
संपूर्ण दिवस हवामान अत्यंत आनंददायी होते आणि शुक्रवारीही हवामान समान राहण्याची अपेक्षा आम्ही करू शकतो.
मान्सूनच्या पावसाचे कारण आहे किनाऱ्यावरील विकसित झालेली ट्रफ रेषा व पूर्व मध्य अरबी समुद्रावर बनलेली चक्रवाती परिस्थिती.
गेल्या एक आठवड्यापासून पुण्यात पावसाचा लपंडाव सुरु होता. आज झालेला पाऊस पुणेकरांसाठी या हंगामातील पहिला जोरदार मान्सूनचा पाऊस होता.
दक्षिण-पश्चिम मान्सूनच्या हंगामात, पुण्यामध्ये जास्त पाऊस नोंदवला जात नाही. जोपर्यंत कोणतीही महत्वपूर्ण हवामान प्रणाली परिसरातून प्रवास करत नाही तोपर्यंत शहरात लक्षणीय पाऊस पडत नाही.
प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया
येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे