उशिरा आगमनानंतर, आता सध्या नैऋत्य मान्सून महाराष्ट्राच्या दक्षिण कोकणात सक्रिय आहे. गेल्या २४ तासांत, या भागामध्ये जोरदार पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, सक्रिय मान्सूनच्या प्रभावामुळे मुंबईमध्ये काही भागात चांगला पाऊस झाला, तर विदर्भ आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस झाला आहे. तथापि, मुंबईतील बरेच भाग मान्सूनच्या चांगल्या पावसाची वाट पाहत आहेत. दरम्यान आता मान्सून कोकण आणि गोवा येथे सक्रिय राहण्याची अपेक्षा आहे, तर विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रमध्ये चांगला पाऊस अपेक्षित आहे.
गेल्या २४ तासांत, वेंगुर्लामध्ये १५० मिमी पावसाची नोंद झाली असून रत्नागिरी येथे १३५ मिमी, अकोला ६३ मिमी, यवतमाळ ६० मिमी, महाबळेश्वर ५६ मिमी, हर्णे ४८ मिमी, कुलाबा (मुंबई) ४४ मिमी , बुलढाणा ४३ मिमी आणि जळगाव येथे ३२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
या पावसाचे प्रमुख कारण महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून केरळच्या किनारपट्टीपर्यंत विस्तारलेली ट्रफ रेषा आहे. आणखी एक कमकुवत ट्रफ रेषा पूर्व उत्तर प्रदेश पासून विदर्भातून मराठवाड्यापर्यंत पोहोचत आहे. हि ट्रफ रेषा काही काळ या क्षेत्रावर कायम राहणार असून, त्यामुळे उत्तर कोकण आणि मुंबईसह गोवामध्ये पावसाळी गतिविधी मध्ये वाढ होईल. तसेच, दक्षिण कोकण आणि गोवा येथे चांगला पाऊस पडेल. त्याचप्रमाणे, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडाच्या काही भागांमध्ये पुढील २४ तासांत पाऊस पडेल.
साधारणपणे २९ जून पर्यंत विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा जोर कमी असेल, परंतु कोकण आणि गोवा तसेच मध्य महाराष्ट्र येथे चांगला पाऊस अपेक्षित आहे.
विदर्भ आणि मराठवाडा येथे २ जुलै रोजी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच ३ जुलै च्या आसपास, मध्य महाराष्ट्रातील अनेक भाग चांगला पाऊस होण्याची अपेक्षा आहे. या पावसामागचे कारण दोन प्रमुख हवामान प्रणाली असतील. पहिली म्हणजे एक कमी दाबाचा पट्टा, जो उत्तर पश्चिम बंगालच्या खडीकडून विदर्भाकडे प्रवास करेल. दुसरी, कोकण आणि गोवा किनारपट्टीवर असलेली ट्रफ. याशिवाय, ह्या पावसाळी गतिविधी सध्या दुष्काळी परिस्थितीशी लढणाऱ्या मराठवाडयासाठी उपयुक्त असतील.
प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया
येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे