[Marathi] महाराष्ट्रात मान्सून अजुन सक्रिय;उद्यापासून राज्यात सर्व ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता

July 4, 2018 5:04 PM | Skymet Weather Team

सध्या नैऋत्य मान्सून च्या आगमनामुळे महाराष्ट्र राज्य सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या ठिकाणांमध्ये मोडत आहे. 3 जुलै रोजी महाराष्ट्रामध्ये सामान्य पावसापेक्षा १६ % जास्ती पावसाची नोंद झाली आहे. वास्तविक, राज्यातील सर्व हवामान विभाग (४) अधिकाधिक पाऊस अनुभवत आहेत. कालच्या दिवशी कोकण मध्ये सर्वात जास्ती अतिरिक्त पावसाची 31% नोंद झाली तर मराठवाडा 20% अतिरिक्त पाऊस, विदर्भ 9% आणि मध्य महाराष्ट्रात सामान्य पावसाची नोंद झाली आहे.

स्काय मेट वेदर च्या हवामान अंदाजानुसार कमी दाबाचा पट्टा समुद्र किनारी निर्माण झाला आहे त्यामुळे वारे सध्या दक्षिण गुजरात कडून कर्नाटक किनारपट्टीकडे वाहत आहे. यामुळेच कोकण मध्ये मुसळधार पाऊस पुढील काही तासात सुरूच राहील असा अंदाज आहे तसेच मुंबई, डहाणू, रत्नागिरी, आणि वेंगुर्ला सारख्या शहरात मुसळधार पाऊस सुरू राहणे अपेक्षित आहे.

दरम्यान, मध्य महाराष्ट्र मधील पुणे, अहमदनगर, कोल्हापूर, सांगली, सातारा या ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो.
या उलट, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये ढगाळ आकाशांसह अधिकतर उष्णता कायम राहण्याची अपेक्षा आहे. तसेच नागपूर, अकोला, वर्धा, गोंदिया, परभणी, हिंगोली, औरंगाबाद, अमरावती आणि वाशिम या शहरांमध्ये हवा मुख्यतः कोरडी राहण्याची शक्यता आहे.तथापि हलका पाऊस पण होऊ शकतो.

[yuzo_related]

ही परिस्थिती येत्या ४८ तास टिकून राहण्याची शक्यता आहे.त्यानंतर, एक चक्री वादळ 5 जुलै ला उत्तर-पश्चिम बंगाल च्या सागरामध्ये तयार होण्याची शक्यता आहे. हि हवामान प्रणाली उत्तर पश्चिम दिशेकडे वळु शकते, त्यामुळे 6 जुलै ला विदर्भ आणि मराठवाडा येथे पावसाची तीव्रता वाढू शकते .
आता इथून पुढे, ७ व ८ जुलै दरम्यान, जवळजवळ संपूर्ण राज्यात चांगला पाऊस कमी तापमानसोबत प्राप्त होईल.

हवामानाचा कृषी विभागावर होणारा परीणाम पाहू;

विदर्भ आणि मराठवाडा मधील शेतकरी बंधूनी जमिनीतील ओलावा बघून कापूस, सोयाबीन, तुर, हरभरे, उडीद इत्यादी खरीफ पिकांची पेरणी सुरु करावी. कारले, भोपळा, चवळी, इ भाज्यांची या काळात लागवड सुरु करावी.

कोकणातील शेतकरी मित्रांनी तांदूळ शेतीमधून जादा पाणी काढून टाकावे तसेच आंबा, काजू आणि चिकू च्या बागेतील जादा पाणी बाहेर काढून टाकावे.

Image Credit: YouTube             

Any information taken from here should be credited to skymetweather.com  

OTHER LATEST STORIES