[Marathi] मुंबईतील पावसाबद्दल: येत्या २४ तासांत मुबईकरांना मुसळधार पावसापासून किंचित आराम, त्यानंतर तीव्रता पुन्हा वाढेल

July 28, 2019 9:25 AM | Skymet Weather Team

गेल्या ४८ तासांपासून मुंबईत पाऊस थांबला नाही आहे. तथापि, गेल्या २४ तासांत तीव्रता किंचित कमी झाली आहे आणि सांताक्रूझ वेधशाळेने गेल्या २४ तासांत केवळ २४ मि.मी. पावसाची नोंद केली आहे.

पावसाची तीव्रता कमी झाली असली तरी, अनेक उपनगरामध्ये जोरदार पाऊस पडला असून त्यामुळे जेव्हीएलआर, कुर्ला, बदलापूर, टिळक नगर, हिंदमाता, अंधेरी, माटुंगा अशा अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. या भागात गुडघा खोलवर पाणी दिसले आहे.

स्कायमेट हवामानानुसार मान्सूनचा प्रभाव काही प्रमाणात कमी झाला आहे, परंतु आम्ही पुढील २४ तासांत मुख्यत: उपनगरामध्ये पाऊस चालू राहण्याची अपेक्षा करतो. शिवाय, पाऊस थोड्या थोड्या विश्रांतीसह सुरु राहील.

उद्यापर्यंत पुन्हा एकदा तीव्रता वाढेल आणि मुंबई व आसपासच्या भागात जोरदार पावसाची नोंद होईल.

अशा प्रकारे, आम्ही असे म्हणू शकतो की येत्या २४ तासांत मुंबईकरांना मुसळधार पावसापासून किंचित आराम मिळेल. त्यानंतर, शहरात पुन्हा एकदा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

एकदा मुसळधार पाऊस परतला कि उड्डाणांचे विवर्तन, शहरातील अनेक भागांत पाणी साचणे, विलंब व भागातील लोकल गाड्या निलंबित आणि मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी दिसून येईल.

प्रतिमा क्रेडीट: द इंडियन एक्सप्रेस

येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे

OTHER LATEST STORIES