[Marathi] पंजाब आणि हरियाणा मध्ये येत्या आठवड्यात पावसाची शक्यता

May 12, 2019 3:10 PM | Skymet Weather Team

गेल्या दोन दिवसांपासून, पंजाब आणि हरियाणातील बऱ्याच भागात धुळीचे वादळ बनलेले आहे, ज्यामुळे या राज्यांतील काही ठिकाणी मेघार्जनेसह हलका पाऊस नोंदवण्यात आला आहे.

पंजाबचे भाग जसे अमृतसर, जालंधर, पटियाला आणि भटिंडा येथे गेल्या २४ तासात हलक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे. तसेच, हरियाणा मधील भाग जसे करनाल, कुरुक्षेत्र आणि हिसार, येथे हि विखुलेला पाऊस पडला आहे.

पावसाचे कारण आहे भारतावर बनलेली विविध हवामान प्रणाली. सध्या एक पश्चिमी विक्षोभ जम्मू काश्मीरवर बनलेला आहे. त्याच्या प्रभावाने एक चक्रवाती परिस्थिती उत्तर पश्चिम राजस्थान आणि लगतच्या पाकिस्तानवर बनलेली आहे.

येणाऱ्या दिवसात, पश्चिमी विक्षोभ आणि त्याच्या प्रभावाने बनलेली चक्रवाती परिस्थितीचा जोर वाढेल आणि आमची अशी अपेक्षा आहे की येणाऱ्या ४ ते ५ दिवसात एका नंतर एक पक्षचिमी विक्षोभ भारताजवळ पोहोचतील .

विकसित होणाऱ्या हवामान प्रणालीमुळे पूर्व मॉन्सूनच्या गतिविधींचा जोर वाढेल व दोन्ही राज्यांतील बऱ्याच भागांमध्ये धुळीचा वादळासह पावसाची शक्यता आहे. येणाऱ्या ४ ते ५ दिवसात दोन्ही राज्यांवर पावसाचा जोर वाढेल.

Also read: Punjab and Haryana gear up for a week of thundershowers and dust storm

अमृतसर, जालंधर, पटियाला, भटिंडा, करनाल, कुरुक्षेत्र आणि हिसार, येथे पावसाची स्थिती बनलेली आहे.

येणाऱ्या पावसामुळे दिवसाच्या तापमान घट दिसून येईल आणि हवामान आरामदायक होईल. प्रचंड गरमीपेक्षा हि काही काळ सुटका मिळेल. पंजाब आणि हरियाणाचे उत्तर भाग, दिवसाच्या तापमानात काही अंशांनी घट नोंदवतील.

प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया

येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे

OTHER LATEST STORIES