[MARATHI] मुंबईने तीन दिवसात मासिक सरासरी गाठली आतापर्यंत ६०४ मिमी पावसाची नोंद

June 21, 2015 6:23 PM | Skymet Weather Team

गेल्या ७२ तासात मुसळधार पावसाने मुंबई अक्षरशः धुऊन निघाली. सांताक्रूझ वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत गेल्या तीन दिवसात ६०४ मिमी पावसाची नोंद झाली आहे आणि या पावसामुळे मासिक सरासरीही( ५२३ मिमी) पार केली आहे.

येत्या २ ते ३ दिवसात मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे पण या होणाऱ्या पावसाची तीव्रता आधी झालेल्या पावसा इतकी नक्कीच नसेल.

भारतातील स्कायमेट या संस्थेच्या हवामान विभागानुसार जून, जुलै आणि ऑगस्ट महिने हे मुंबईसाठी भरपूर पावसाचे असणार आहेत. तरीही असा मुसळधार पाऊस क्वचित होत असतो.

या मुसळधार पावसासाठी मूळ कारण म्हणजे वातावरणात निर्माण झालेल्या एका पेक्षा अधिक हवामान प्रणाली, पश्चिम किनारपट्टीजवळ निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात मान्सून प्रभावी राहण्यास मदत होते आहे. तसेच ईशान्येकडील अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाचे क्षेत्र आणि त्याबरोबरच चक्रवाती हवेचे अभिसरण या मुळेही महाराष्ट्रात मान्सूनच्या लाटेचा प्रभाव नैऋत्यमोसमी वाऱ्यांच्या स्वरुपात वाढला आहे.

हे कमी दाबाचे क्षेत्र आता पश्चिमेकडे सरकले असले तरी पश्चिम किनारपट्टीजवळ निर्माण झालेल्या क्षेत्राचा प्रभाव होतच राहणार असल्याने पावसात कमतरता जाणवणार नाही. तरीही या मुळे फक्त पश्चिम किनारपट्टीला व मुंबईला असलेल्या मान्सूनची तीव्रता कमी होईल.

(Featured Image Credit: mid-day.com)

OTHER LATEST STORIES