महाराष्ट्र राज्यात आतापर्यंत तीन वेळा अवकाळी पावसाची नोंद झाली आहे. पहिले २५ ते २७ डिसेंबर दरम्यान, दुसऱ्यांदा ३१ डिसेंबर ते ३ जानेवारी दरम्यान आणि नुकत्याच झालेल्या दोन दिवसात विदर्भामध्ये जोरदार पाऊस पडला.
स्कायमेटकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार गोंदिया येथे (बुधवारी सकाळी साडेआठ वाजल्यापासून) चोवीस तासांच्या कालावधीत ५१ मिमी पावसाची नोंद झाली असून काही भागांत गारपिटीच्या घटनाही नोंदल्या गेल्या.
ह्या पावसाचे प्रमुख कारण पश्चिमी विक्षोभाचा प्रभावा असून त्यामुळे उत्तरेकडील मैदानांवर भारतात एक चक्रवाती अभिसरण प्रवर्तित झाले असून त्यासोबत एक कमी दाबाचा पट्टा मध्य भारता पर्यंत विस्तारत आहे.
हि प्रणाली आता कमकुवत झाली आहे त्यामुळे महाराष्ट्रात देखील पावसाचा जोर ओसरला आहे. परंतु, या प्रणालीच्या हालचालींमुळे उत्तरेकडील थंड वाऱ्यांना राज्यात प्रवेश करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे ज्यामुळे तापमानात घट होईल.
मुंबईतील किमान तापमानात आधीच ४ अंश सेल्सिअसने घट झाली असून आज सकाळी १६.४ अंश तापमानाची नोंद झाली. बुलडाणा येथेही तापमानात कालच्या १८ अंशांवरून १२.६ अंशांपर्यंत घसरण झाली.
इतर अनेक शहरांमध्येही जसे जळगाव, नाशिक येथे किमान तापमानात ४ ते ६ अंशांची घट झाली आहे. उदाहरणार्थ, नाशिकमध्ये काल पारा १६ अंशांवरून १० अंशांवर आला.
आमच्या हवामानशास्त्रज्ञांच्या अनुसार, उत्तर दिशेकडून थंड वारा वाहण्यास सुरुवात झाल्याने पुढील २४ तासांत तापमानात आणखी घसरण अपेक्षित आहे. मुंबईलाही पुढील दोन दिवसांत हिवाळ्यातील थंडी (या हंगामात प्रथमच) जाणवू शकेल.
तथापि, ४८ तासांनंतर, पश्चिमी विक्षोभामुळे वाऱ्यांची दिशा पुन्हा बदलण्याची शक्यता आहे, ज्याचा परिणाम तापमान वाढीवर होईल.
महाराष्ट्रात हवामानात विभिन्न परिस्थितींची नोंद अलीकडेच होत आहे. एकीकडे पश्चिम भाग कोरड्या हवामानाचा अनुभव घेत आहे, तर दुसरीकडे विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांत पाऊस आणि गडगडाटी गतिविधी दिसून येत आहे.
Image Credits – Encyclopedia
Any information taken from here should be credited to Skymet Weather