कोल्हापूरसह दक्षिण मध्य महाराष्ट्रातील बर्याच भागात गेल्या दोन दिवसांपासून गडगडाटासह जोरदार पाऊस पडत आहे तसेच शहराच्या काही भागात जोरदार सरी बरसल्या आहेत.
गेल्या २४ तासांत शनिवारी सकाळी साडेआठ वाजेपासून कोल्हापुरामध्ये ३३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सकाळपासूनच शहरात अधून मधून मध्यम सरी कोसळत आहेत.
या पावसाचे श्रेय दक्षिण गुजरात ते केरळ किनारपट्टीपर्यंत विस्तारलेल्या ट्रफ रेषेला जाऊ शकते.
हि प्रणाली आणखी काही काळ कायम राहणार असल्याने अजून ३६ ते ४८ तास गडगडाटासह मध्यम पाऊस सुरु राहील व त्यानंतर जोर कमी व्हायची शक्यता आहे.
शहरात वातावरण आल्हाददायक असून कमाल तापमान २५ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २१ अंशाच्या जवळपास आहे. अशीच स्थिती आणखी दोन दिवस राहण्याची शक्यता आहे.
या पावसाळी गतिविधी पिकांसाठी फायदेशीर ठरतील.
खरं तर, गेल्या बर्याच दिवसांपासून महाराष्ट्राच्या बर्याच भागांत चांगला पाऊस पडत आहे. मुंबई, ठाणे, कुलाबा, अलिबाग, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, पुणे, महाबळेश्वर, नागपूर, गोंदिया, अकोला, अमरावती या ठिकाणी पुढील ४८ तासांत मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Image Credits – DD News
Any information taken from here should be credited to Skymet Weather