संपूर्ण ऑक्टोबर महिन्यात राज्यात कोरडे हवामान अनुभण्यात आले आहे. विशेषतः,उत्तर महाराष्ट्र तसेच उत्तर कोकण- गोवा, या भागांवर पाऊसाची खूप कमी नोंद करण्यात आली ज्यामुळे महाराष्ट्र सरकारने बुधवारी १५० तालुक्यात दुष्काळ ग्रस्त घोषित केले आहे.
सध्या कर्नाटक व उत्तर मध्य महाराष्ट्रावर एक कमी दाबाचा पट्टा विकसित झाला आहे ज्यामुळे ३ व ४ नोव्हेंबरच्या आसपास उत्तर मध्य महाराष्ट्र, उत्तर कोंकण-गोव्यासह, पुणे नाशिक आणि मुंबईमध्ये हलक्या पाऊसाची शक्यता आहे .
परंतु हा पाऊस क्षणिक असून, संपूर्ण राज्यात हवामान पुन्हा एकदा कोरडे होतील आणि गरम हवामानाची परिस्थिती पुन्हा प्रस्तावित होईल .
दुसरीकडे मराठवाड्यावर हलका पाऊस नोंदवण्यात आला आहे .सध्या हवामानाची परिस्थिती पाहता, येत्या आठवड्यातही विदर्भावर पाऊस पडण्याची कोणतीही शक्यता दिसत नाही.
मुंबईत देखील 18 ऑक्टोबर पासून चांगल्या पाऊसाची नोंद करण्यात आलेली नाही आहे . येणाऱ्या दिवसात हवामानात फार मोठा बदल नसून , हवामान कोरडेच राहणे अपेक्षित आहे.
Image Credits –DNA India
Any information taken from here should be credited to Skymet Weather