Skymet weather

[Marathi] Mumbai Rains: मुंबईत काही तासांतच १३२ मिमी पाऊस, १७ उड्डाणे वळविण्यात आली आहेत

July 27, 2019 12:53 PM |

Mumbai rains marathi

मुंबईत परत पावसाने जोर धरला आहे व येथे मध्यम पावसाहसह बऱ्याच ठिकाणी एक दोन जोरदार सरींची नोंद झाली आहे .काल मुंबई शहरासाठी पावसाळी दुपार होती आणि संध्याकाळच्या वेळी पावसाने जोर धरला.

गेल्या १२ तासांत सांताक्रूझ येथे १३२ मिमी पाऊस झाला त्यापैकी संध्याकाळी ५:३० ते ११:३० पर्यंत फक्त ६ तासांत १२४ मिमी पावसाची नोंद झाली. मुंबईच्या इतर भागातही तीन अंकी पाऊस झाला आहे.

जोरदार पावसामुळे शहरात वाहतुकीस अडथळे निर्माण झाली आहे. मुंबईत मुसळधार पावसामुळे १७ उड्डाणे वळविण्यात आली असून अनेक भाग पाण्याखाली आले आहेत.

सर्वात जास्त त्रास जेव्हीएलआर, कुर्ला, बदलापूर, टिळक नगर, हिंदमाता, अंधेरी, माटुंगा आणि इतर अनेक ठिकाणी झाले आहेत जिथे गुडघ्यापर्यंत खोलवर पाणी दिसले आहे. शिवाय कार्यालयीन प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला आणि बरेच लोक रस्त्यावर अडकले आहे. मुंबईकरांसाठी शुक्रवारी रात्रीचा दिवस खूपच त्रासदायक होता.

स्कायमेटच्या हवामानज्ञांच्या म्हणण्यानुसार मुंबईत थोड्या थोड्या विश्रांतीसह पाऊस सुरु राहील. याशिवाय, अधिक पावसामुळे जलरोधक आणि वाहतुकीची कोंडी होऊ शकते

तथापि, उद्या दुपारनंतर जोरदार पावसापासून काही काळ आराम मिळेल.






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try