[Marathi] पुणे नागपूर येथे पावसाची शक्यता, करडई आणि तुरीची कापणी पूर्ण करावी

February 7, 2018 6:37 PM | Skymet Weather Team

संपुर्ण  महाराष्ट्र  मागील काही दिवसांपासून कोरड्या वातावरणाचा  अनुभव घेत आहे, ज्यामुळे कमाल  तापमानात सरासरीपेक्षा  वाढ  झाली आहे.

विदर्भात  किमान  तापमानात सुद्धा  सरासरीपेक्षा तीन ते चार अंश वाढ झाली आहे. अकोला, वर्धा आणि  अमरावती  येथे  रात्रीच्या तापमानात  सरासरी  पेक्षा ४ अंश  वाढ झाली आहे.

दरम्यान, विदर्भातील सर्वच  जिल्यात कमाल तापमान  सुद्धा सरासरीच्या किंचित वर  नोंदले गेले आहे. जसे की, नागपूर आणि  यवतमाळ  येथे कमाल तापमान सरासरीच्या वर  २ अंश  नोंदले  असून, गोंदिया  येथे मात्र कमाल तापमान सरासरीच्या वर एक  अंश  इतके होते.

[yuzo_related]

स्काय मेट  वेदर च्या हवामान  अंदाजानुसार  येत्या  चोवीस  तासांत  विदर्भातील  हवामानात  फार  मोठे  बदल अपेक्षित नाहीत. त्यानंतर मात्र तापमानात  दोन ते तीन अंश  सेल्सिअस ची घट  होण्याची शक्यता आहे.  त्याप्रमाणेच  १० ते १२ फेब्रुवारी  दरम्यान  विदर्भात  हलक्या  पावसाची शक्यता  आहे.

मध्य महाराष्ट्रात सुद्धा मागील बऱ्याच दिवसांपासून  हवामान कोरडे राहिले आहे.  सद्यःस्थितीत मध्य महाराष्ट्रात  वातावरण ढगाळ असून  तेथे तापमानात काहीशी वाढ झाली आहे. किमान तापमान सुद्धा  याठिकाणी  सरासरीपेक्षा पाच  ते सहा  अंश  सेल्सिअस  जास्त आहे.

Click here to get the live lightning and thunderstorm status across Maharashtra

आज  सातारा , नाशिक  या जिल्ह्यांमध्ये सुद्धा  किमान तापमान हे सरासरीच्या वर  ५ अंश इतके नोंदले गेले. पुण्याच्या  रात्रीच्या  तापमानात  सुद्धा  वाढ झाली असून, रात्रीचे तापमान हे सरासरीपेक्षा  ६ अंश सेल्सिअस  जास्त होते, तसेच कोल्हापूर आणि  सांगली येथे सुद्धा  किमान तापमान सरासरीपेक्षा  ४ अंश सेल्सिअस जास्त होते.

स्काय मेट  वेदर  च्या अंदाजानुसार  मध्य महाराष्ट्रात  उत्तर आणि  ईशान्य  दिशेकडून येणाऱ्या  वाऱ्यांमुळे  तापमानात  २ ते ३ अंश सेल्सिअसची  घट  होईल.  १२ फेब्रुवारीला दक्षिण मध्य महाराष्ट्रात हलक्या  पावसाचा  अंदाज आहे.

वातावरणात  होणाऱ्या  बदलामुळे  शेतकऱ्यांसाठी शिफारस

वाढणाऱ्या  तापमानामुळे पिके पक्व होण्यास मदत होत असून,  शेतकऱ्यांनी  हरभरा, करडई, ज्वारी  आणि तुरीची  कापणी  आणि मळणी  पूर्ण  करावी. शेतकऱ्यांनी पिके गोण्यामध्ये  भरून कोरड्या  ठिकाणी साठवणूक करावी.  गव्हाच्या पिकास आवश्यकतेनुसार  स्प्रिंकलर  ने पाणी द्यावे. गव्हाच्या  पिकावर ढगाळ वातावरत किड  पडण्याची शक्यता लक्षत घेऊन  पिकाची काळजी घ्यावी. गरज असल्यास  औषधी  फवारावी.

पूर्व  विदर्भ आणि  मध्य महाराष्ट्रातील  शेतकऱ्यांनी  उन्हाळी  भुईमुगाची  पेरणी पूर्ण करावी.  तसेच लवकर पेरलेल्या  भुईमुगास  हलके सिंचन द्यावे.

Image Credit:  Instagram (Subho 2)         

Any information taken from here should be credited to skymetweather.com

OTHER LATEST STORIES