मागील आठवड्याच्या उत्तरार्धात उत्तर भारतात पावसाची नोंद झाली. पश्चिम राजस्थान, सौराष्ट्र आणि कच्छच्या काही भागात अवकाळी पाऊस आणि गारपीटीचा अनुभव आला. कमकुवत आणि सुस्त ईशान्य मान्सूनने आठवड्याच्या उत्तरार्धात गती घेतली. गेल्या आठवड्यात स्कायमेटने म्हटल्याप्रमाणे ऑक्टोबरमध्ये अतिरिक्त पाऊस झाल्यानंतर नोव्हेंबरमध्ये ईशान्य मान्सूनची कामगिरी खराब राहिली होती. तथापि, चक्रीवादळ आणि इतर हवामान प्रणालींच्या रूपात यापुढे अडथळे नसल्याने ईशान्य मॉन्सून या आठवड्यात आणखी बळकट होण्याची शक्यता आहे.
ईशान्य मान्सून या आठवड्यात सक्रिय होणार
येत्या २० नोव्हेंबरला पश्चिमी विक्षोभाच्या आगमनाची अपेक्षा आहे तोपर्यंत उत्तर भारतात कोरड्या हवामानाची स्थिती कायम राहील. या प्रणालीचा मोठ्या प्रमाणात उत्तरी डोंगरांवर परिणाम होणार असून जम्मू-काश्मीर हा मुख्य लाभार्थी आहे. गुजरात आणि राजस्थानसह उत्तरेकडील मैदानावर कोरड्या हवामानाचा अनुभव येईल आणि आठवड्याच्या पूर्वार्धात तापमानात किंचित घट होईल.
ईशान्य मान्सून या आठवड्यात जवळपास सर्व उपविभागांवर सक्रिय असण्याची शक्यता आहे. मान्सून गतिविधी विशेषत: तामिळनाडूत जोरदार असतील. स्कायमेटकडे उपलब्ध पावसाच्या आकडेवारीनुसार १ ऑक्टोबर ते १७ नोव्हेंबर या कालावधीत चेन्नईत ४१ टक्के पावसाची कमतरता नोंदली गेली आहे. सक्रिय पावसाळ्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर या आठवड्यात ही तूट कमी होण्याची शक्यता आहे. मध्य आणि पूर्वेकडील भारत कोरड्या हवामानाचा अनुभव घेईल आणि जसजसा आठवडा पुढे सरकेल तसतसे या भागात तापमान कमी होईल. ईशान्य भारतात हवामान विषयक गतिविधी अरुणाचल प्रदेश आणि शेजारच्या वरच्या आसामपुरत्या मर्यादीत असतील.
दिल्लीकरांना येणाऱ्या दिवसात मोकळा श्वास घेता येणार
दिल्लीत प्रदूषण ३ नोव्हेंबरच्या सुमारास शिगेला पोहोचले जेव्हा बहुतेक ठिकाणी हवेची गुणवत्ता दर्शक एक्यूआय १००० पेक्षा जास्त नोंदला गेला. त्यानंतर लगेचच मध्यम वायव्येकडून येणारे वारे दिल्लीकरांच्या मदतीला आले आणि ५ नोव्हेंबरपर्यंत हवेच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा झाली. ११ नोव्हेंबरपासून दिल्लीतील हवेची गुणवत्ता पुन्हा एकदा अत्यंत गंभीर श्रेणीत गेली आहे आणि काही भागात हवेच्या गुणवत्तेची धोकादायक प्रकारात नोंद झाली आहे. दुर्दैवाने, नोव्हेंबर महिन्यात दिल्लीकरांसाठी हि एक असामान्य परिस्थिती नाही.
प्रदूषणाच्या या अचानक होणाऱ्या वाढी मागील कारण पश्चिम हिमालय ओलांडून येणाऱ्या पश्चिमी विक्षोभांना जबाबदार धरले जाऊ शकते. यामुळे वारे हलके व शांत असतात. शिवाय ढगाळ वातावरणामुळे सूर्यप्रकाश प्रतिबंधित होतो आणि जमिनीच्या जवळ असलेली हवा त्याच्या वरच्या हवेपेक्षा थंड होते. ही थंड हवा जमिनीजवळ अडकून राहते आणि धुके तयार करते. पेंढ्यांच्या जाळण्याने तयार होणारा धूर व धूळ यांचे प्रदूषक धुकेमध्ये मिसळतात आणि प्रदूषण मिश्रित धुक्याचा थर तयार होतो.
पश्चिमी विक्षोभ १६ नोव्हेंबरपर्यंत निघून जाईल आणि उत्तर पश्चिमेकडील मध्यम वारे पुन्हा एकदा प्रदूषकांना वाहून नेतील आणि पुढील काही दिवस दिल्लीत हवेची गुणवत्ता सुधारेल.
पिकांवर परिणाम
रब्बी पिकांची पेरणी सुरू आहे. पश्चिम राजस्थान आणि सौराष्ट्र आणि कच्छ येथे येत्या आठवड्यात अपेक्षित हलका पाऊस पडल्यास जमिनीतील ओलावा वाढेल आणि पेरणी प्रक्रियेसाठी फायदेशीर ठरेल.
Image Credits – DNA India
Any information taken from here should be credited to Skymet Weather