[Marathi] उत्तर भारतातील डोंगराळ भागात पुढील तीन दिवस लख्ख सूर्यप्रकाश

May 1, 2015 9:42 PM | Skymet Weather Team

जम्मूकाश्मीरमध्ये नुकत्याच होऊन गेलेल्या पश्चिमी विक्षोभामुळे उत्तर भारतातील तिन्ही डोंगराळ राज्यात भरपूर पाऊस झाला. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडापेक्षाही जम्मूकाश्मीर मध्ये पावसाची तीव्रता जास्त होती.

देशातील उत्तरेकडील डोंगराळ भागातील पाऊस :

गुरुवारी सकाळी ८.३० ला घेतलेल्या नोंदीनुसार गेल्या २४ तासात झालेल्या पावसाची नोंद पुढीलप्रमाणे

जम्मूकाश्मीर मधील पाऊस

बनिहाल १०.७ मिमी, भादेरवाह ५०.२ मिमी, बटोट ३२.६ मिमी, गुलमर्ग ५ मिमी, काजीगंद ८ मिमी, कटरा १८.४ मिमी, जम्मू १३ मिमी आणि कोकेरनाग १० मिमी पावसाची नोंद करण्यात आली. तसेच पहलगाम आणि श्रीनगरला पावसाच्या हलक्या सरी झाल्याची नोंद केली गेली.

हिमाचल प्रदेशातील पाऊस

कल्प १७.४ मिमी, कुल्लू ६ मिमी, केयलोग १२ मिमी, मानली १० मिमी, शिमला ६ मिमी आणि सुंदरनगर १२ मिमी पावसाची नोंद करण्यात आली.

उत्तराखंड येथील पाऊस

पंतनगर २२ मिमी, देहरादून ८ मिमी, अलमोरा ९ मिमी, मुक्तेश्वर १४ मिमी, तेहरी १०.५ मिमी आणि उत्तरकाशी १० मिमी पावसाची नोंद केली गेली.
हे सर्व वातावरणातील बदल नुकत्याच होऊन गेलेल्या विक्षोभ प्रणाली मुळे झालेले आहेत. अगदी तंतोतंत बघितल्यास तापमान हे १० ते १२ अंश से. ला स्थिरावले आहे. जसजशी प्रणालीची क्षमता कमी होईल तसतसे तापमानात वाढ होताना दिसेल.

जम्मू आणि काश्मीर मधील तापमान

गुरुवारी सरासरी तापमानापेक्षा खाली स्थिरावलेले वेगवेगळ्या ठिकाणी असलेले कमाल तापमान

सध्या प्रणालीची तीव्रता कमी झाल्याने तुरळक ठिकाणी थोडाफार पाऊस होण्याची शक्यता आहे. उत्तरी भारतात आता पुढील २-३ दिवस लख्ख सूर्यप्रकाशामुळे आल्हाददायक वातावरण असेल. पश्चिमी विक्षोभ आता उत्तरे कडे सरकेल आणि पुन्हा उन्हाळ्याची तीव्रता जाणवेल. ह्या प्रणालीची हालचाल बघता आता डोंगर पायथ्याशी व सपाटी वरील उत्तर भारतात पाऊस होण्याची शक्यता नाही.

Image Credit: The Hindu

 

 

OTHER LATEST STORIES