दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा रंजक होत असून मयांक अग्रवाल आणि रोहित शर्माच्या फलंदाजीतूनच धावांचा पाऊस पडत आहे. विशाखापट्टणम येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने तब्बल २०३ धावांनी विजय मिळविला. एक दिवस थोडासा व्यत्यय वगळता पावसामुळे या सामन्यात कुठेही अडचण आली नाही.
तथापि, दुसऱ्या कसोटी सामन्यात पावसाळी गतिविधी मोठ्या अडथळा ठरत आहेत. आजपासून दुसरा कसोटी सामना पुण्यात महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमध्ये खेळला जाणार आहे.
मागील काही दिवसांपासून पुण्यात कमी अधिक प्रमाणात पावसाळी गतिविधी सुरुच असून काल जोरदार गडगडाटी पाऊस झाला आहे. बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसामुळे झाडे उन्मळून पडली असून एक व्यक्तीचा मृत्यू देखील झाला आहे.
पाच दिवसांच्या सामन्यात, पहिल्या दिवसाच्या खेळात पावसामुळे व्यत्यय येण्याची शक्यता तशी खूप कमी असून पाऊस झाला तरी तो फक्त दुपारी उशीरा किंवा संध्याकाळी होण्याची शक्यता आहे. आज, केवळ तुरळक सरींची अपेक्षा आहे.
मात्र, उद्या आणि परवा म्हणजे सामन्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी पुण्यात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे ज्यामुळे खेळात व्यत्यय येण्याची शक्यता आहे. चौथ्या दिवशी मात्र पावसाचा जोर ओसरून १३ आणि १४ ऑक्टोबर या काळात हवामान जवळपास कोरडे राहील.
थोडक्यात, पुण्यात झालेल्या पावसामुळे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसर्या कसोटी सामन्यात काही प्रमाणात व्यत्यय येण्याची शक्यता आहे.
Image Credits – MSN.com
Any information taken from here should be credited to Skymet Weather