विदर्भातील बहुतांश भागात उष्ण लाटेची स्थिती चालूच आहे. दरम्यान, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र यासारख्या राज्यातील बहुतांश भागात उष्ण हवामानाचा सामना होत आहे.विदर्भातील बहुतेक भागांमध्ये तापमान ४५ अंशापेक्षा जास्त आहे.
[yuzo_related]
मंगळवारी चंद्रपूरमध्ये कमाल तापमान ४५. ९ अंश एवढे नोंदविले गेले तर ,वर्धा ४५, ब्रह्मपुरी ४४. ७ , नागपूर ४४. ५, अकोला ४४. ५, परभणी ४४. ५ , नांदेड ४४. ५अंश आणि यवतमाळ मध्ये दिवसाचे कमाल तापमान ४४ अंश एवढे नोंदविले गेले .
दुसरीकडे, कोकणचे हवामान उबदार आहे, परंतु कमाल तापमान अद्याप सामान्य तापमानाएवढे किंवा किंचित त्यापेक्षा थोडे जास्त आहे .या क्षेत्रातील जास्तीत जास्त कमाल तापमान ३२ ते ३३ अंश एवढे नोंदविले गेले आहे.
दरम्यान, मध्य महाराष्ट्र मधे कमाल तापमान ३० अंशाच्या थोडे वर जाऊन स्थिर होत आहे . मंगळवारी, मुंबई येथे कमाल तापमानाची ३३. ३ अंश ,रत्नागिरी ३३. ६ , डहाणू ३४. २, नाशिक ३७. ६ , आणि कोल्हापूर ३८. ६ एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली आहे.पुढील काही दिवसात हवामानामध्ये कोणताही बदल अपेक्षित नसुन , विदर्भ व इतर विभागा मध्ये उष्णतेची लाट येत्या ४८ तासात सुरू राहील.
कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेले वारे छत्तीसगडमधील भागाकडून तामिळ्नाडूकडे तेलंगणामधून वाहत आहेत ,त्यामुळे पुढील २४ तासात विदर्भातील काही भागांत तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे . या पूर्व-मान्सून पाऊसामुळे कमाल तापमान कमी होणार नाही परंतु थोडा दिलासा उष्ण हवामानापासून मिळू शकतो .
उष्ण हवामानाचा महाराष्ट्र कृषीवर होणारा परीणाम पाहू ;
विदर्भातील उष्णतेची लाट बघता शेतकरी बंधूंसाठी सल्ला आहे ,त्यांनी वेळोवेळी पिकांना पानी दयावे . जमिनीतील ओलावा जतन करण्यासाठी पेंढा / पॉलिथिन आच्छादन करावे लाल मिरची मध्ये फुल गळती होऊ नये म्हणून सिंचन दयावे . कीड नियंञण करण्यासाठी बुरशीनाशकाचा वापर करावा . दक्षिण कोकण मध्ये, तांदूळ कापणी सुरू ठेवा.शेतकरी मित्रांनी परिपक्व भुईमूग पीक काढावे व ३ ते ४ दिवस शेंगा वाळूवून मग साठवुन ठेवावे . आंबे, सुपारी, काजू काढणी सुरू ठेवा.
IMAGE CREDIT: Hindustantimes.com
Any information taken from here should be credited to skymetweather.com