सध्या महाराष्ट्राची हवामानाची स्थिती कमाल तापमान जास्त असल्या कारणाने अत्यंत उष्ण अशीच आहे. खरेतर, विदर्भ क्षेत्राच्या काही भागात उष्णतेची लाट मुक्काम ठोकुन आहे. शिवाय, दक्षिणेकडील भागांच्या तुलनेत राज्याच्या उत्तरेकडील भागात जास्त उष्ण असे हवामान आहे.
[yuzo_related]
सध्य स्थितीत राज्यात कोरडे हवामान राहील . तसेच सर्वदुर कोरड्या हवामानामुळे दिवसाच्या तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता आहे.तसेच विदर्भ, मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्र या ठिकाणची आर्द्रता वाढण्याची शक्यता आहे.त्यामुळे विदर्भ, मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्र यासारख्या भागात उष्णतेची परिस्थिती अजून तीव्र होईल व उकाडा वाढेल.
दरम्यान, चंद्रपूर, नांदेड आणि नागपूर अशा ठिकाणी उष्माघात होण्याची शक्यता आहे. सांगली, सातारा आणि कोल्हापूर राहील जिल्ह्यांतील दिवसाचे कमाल तापमान उत्तरेकडील भागांपेक्षा कमी असेल. स्काय मेट वेदर च्या अंदाजानुसार राज्यातील उत्तरेकडील जिल्हे जळगाव, पुणे आणि नाशिक येथे हवामान उष्ण व कोरडे राहील कारण वायव्य दिशेकडुन येणारे वारे त्या भागाकडे आगेकुच करत आहेत.
दरम्यान, मुंबई आणि रत्नागिरी सारख्या सागरी किनाऱ्याजवळील भागात हवामान उष्ण व दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भ प्रदेशात किमान तापमान हे, सामान्य तापमानाएवढे नोंद होईल असे अपेक्षित आहे. दुसरीकडे,मध्य महाराष्ट्रात किमान तापमान सरासरी तापमानाच्या काही अंश कमी नोंदविले जाईल .
IMAGE CREDIT: Wikipedia.org
Any information taken from here should be credited to skymetweather.com