सद्यस्थितीनुसार महाराष्ट्र, गुजरात आणि पश्चिम राजस्थान हे भारतातील सर्वात उष्ण प्रदेश आहेत. या प्रदेशांमध्ये कमाल तापमान ४० अंश से. च्यावर जाते आहे, त्यामुळे दुपारी असह्य उकाडा जाणवत आहे.
गुजरात मधील हवामान
उत्तर गुजरात सध्या उष्ण लहरीचा प्रकोप अनुभवत आहे. तेथील तापमान सरासरी पेक्षा ४ अंश से. जास्त आहे. शुक्रवारी घेतलेल्या तापमानाची नोंद पुढीलप्रमाणे भूज (४४.२ अंश से.), अमरेली (४३.६ अंश से.), राजकोट (४३.८ अंश से.), अहमदाबाद (४२.५ अंश से.)
राजस्थान आणि महाराष्ट्रातील हवामान
विदर्भ आणि राजस्थान मधील जनतेलासुद्धा उष्ण लहरीच्या तडाख्याला सामोरे जावे लागत आहे. या दोन राज्यातील वातावरणात फारश्या घडामोडी होत नसल्याने कमाल तापमान सरासरीपेक्षा २ ते ३ अंश से. ने जास्त आहे.
राजस्थानातील चित्तोडगढ येथे ४३ अंश से. (सरासरीपेक्षा ३ अंश से. वर). चुरू, जैसलमेर आणि जयपूरलासुद्धा पारा ४० अंश से. वर चढलेला दिसून आला.
महाराष्ट्रातील बऱ्याच ठिकाणी कमाल तापमान खूप जास्त होते. चंद्रपूर येथे सर्वात जास्त म्हणजे ४५ अंश से. तापमानाची नोंद झाली त्यामुळे ते स्कायमेटच्या पहिल्या दहा सर्वाधिक कमाल तापमानाची ठिकाणे या यादीत सर्वात वर आहे.
महाराष्ट्रात शुक्रवारी घेतलेल्या कमाल तापमानाच्या नोंदी पुढील प्रमाणे अकोला ४२.८ अंश से., अमरावती ४२.८ अंश से., भिरा ४१ अंश से. आणि बुलढाणा ४०.३ अंश से. मालेगावलाही उष्ण लहरी सदृश परिस्थिती असून तेथील कमाल तापमान ४३.८ अंश से. (सरासरीपेक्षा ३ अंश से. जास्त) नोंदले गेले. नागपूरलाही कमाल तापमानाची नोंद ४४ अंश से. झाली.
या राज्यांमध्ये वायव्येकडून येणाऱ्या कोरड्या व उष्ण वाऱ्यांमुळे तेथील तापमानात कमालीची वाढ झालेली आहे. पुढील तीन चार दिवस तरी या असह्य उकाड्या पासून सुटका होण्याचे चिन्ह दिसत नाही.
Image Credit: Indiatvnews.com