Skymet weather

[Marathi] नाशिक, पुणे येथे कोरडे हवामान, पिकांची कापणी पूर्ण करा

March 19, 2018 6:15 PM |

Nashik 1

जवळपास एक महिना कोरडे राहिल्यानंतर, मध्य महाराष्ट्रात मागील २४ तासांत  काही ठिकाणी तुरळक ते मध्यम  स्वरूपाचा पाऊस पडला.   या पूर्वी दि. १७ तारखेला मध्य  महाराष्ट्रात हलक्या पावसाची नोंद झाली.

मागील २४ तासात, रविवारी  सकाळी ८.३० पासून, कोल्हापूर येथे १३ मिमी पावसाची नोंद झाली, तर सोलापूर येथे अत्यंत हलक्या स्वरूपाचा ०.१ मिमी पाऊस झाला. या काळात महाराष्ट्रात पाऊस पडण्याचे कारण म्हणजे कोमोरीन भागावरून दक्षिण मध्य महाराष्ट्रात असणारा कमी दाबाचा पट्टा आहे. पण आता, वर नमूद केल्याप्रमाणे कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे सरकत असून आता  कोमोरीन ते कर्नाटक च्या अंतर्गत भागात  कार्यरत आहे.  ज्यामुळे  हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.

जर तापमानाची स्थिती बघीतली गेल्यास , कमाल तापमानात मोठ्या प्रमाणात बदल संभवत नाहीत.  तापमानाचा पारा ३५ अंशाच्या आसपास  असून आता   त्यापेक्षाही जास्त जाण्याची शक्यता आहे. तसेच  दक्षिण पूर्व  दिशेने वाहणारे दमट आणि गरम वारे यामुळे,  रात्रीच्या तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता आहे.

[yuzo_related]

शेतीची करावयाची कामे

सततच्या ढगाळ हवामानामुळे द्राक्ष, डाळिंब, आंबा आणि भाजीपाला पिकात रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे , त्याबद्दल शेतकरी बांधवानी जागरूक राहावे. सोबतच आंबिया बहरातील फळझाडामध्ये फुलगळ आणि फळगळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.  शेतकऱ्यांनी त्यासाठी योग्य उपाय योजना करावी. येत दिवसात हवामान मुख्यतः कोरडे राहील त्यामुळे पिकाची कापणी करावी.

Image Credit:  wikipedia           

Any information taken from here should be credited to skymetweather.com






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try