[Marathi] महाराष्ट्रात तापमानाचा पारा वाढला, उष्णतेची लाट; आंबा आणि मोसंबी चा बहार गळण्याची शक्यता

March 26, 2018 4:41 PM | Skymet Weather Team

महाराष्ट्रात तापमानाचा पारा वाढत आहे.  संपूर्ण राज्यामध्ये उष्णतेची लाट आली असून ,पारा ४१ अंशपार पोचला आहे. कोंकण आणि गोव्याला ह्याची सगळ्यात जास्त झळ पोहचली असून, तापमान सरासरी पेक्षा  ३-४ अंशाने  जास्त आहे.

समुद्र किनारी असल्यामुळे उष्णता जास्त जाणवत असून  उकाड्याने सर्वाना त्रस्त केले आहे. रविवारी, मुंबई चे दिवसाचे कमाल तापमान ८ अंशाने वाढून विक्रमी  ४१ °C नोंदले गेले, जे २०११ नंतर सर्वात जास्त उष्ण आहे.

उष्णतेची झळ संपुर्ण राज्यास बसली असून, उष्णतेच्या दाहकतेमुळे  मराठवाडा आणि विदर्भातील तापमान सुद्धा ४० अंशाच्या पार गेलं आहे. ब्रम्हपुरी, अकोला वर्धा, सोलापूर, परभणी, येथे तापमान ४०°C  च्या जवळ नोंदले गेले.  तर अहमदनगर, नागपूर, नाशिक, नांदेड, पुणे, सांगली, सातारा, वेंगुर्ला येथेही तापमान ३७-३९ अंश होते.

[yuzo_related]

स्काय मेट वेदर नुसार तापमानात काही प्रमाणात घट होऊ शकते. तरी पण  सर्वसाधारणपणे तापमान सरासरीपेक्षा जास्त राहून उकाडा  राहील.

उत्तर मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र  येथे तापमानाचा पारा आणखी वाढू शकतो.

शेतीवर वातावरणाचा होणारा परिणाम

वाढलेल्या तापमानामुळे आणि उष्णतेमुळे मोसंबी, आंबा, आणि संत्राच्या बागेत फळांची  गळ होऊ शकते.  त्यानुसार शेतकरी बांधवानी उपाययोजना तयार करावी.   उन्हाळी भुईमूग आणि मका पिकास आवश्यतेनुसार  सिंचन द्यावे. शेतकरी बांधवानी फळबागेस पाणी  द्यावे. द्राक्ष आणि संत्रा  फळाची तोडणी सूरु  ठेवावी.

Image Credit:  Wikipedia             

Any information taken from here should be credited to skymetweather.com

OTHER LATEST STORIES