आज सकाळी ११.४१ मिनिटांनी दिल्ली एन सी आर, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, बिहार, झारखंड, कलकत्ता आणी गुजरात मधील काही भागात या भूकंपाचे तीव्र हादरे जाणवले. महाराष्ट्रातील नागपूर व चंद्रपूर येथे देखील हलक्या स्वरूपाचे हादरे जाणवले. या भूकंपाची तीव्रता ७.९ रिश्टर स्केल एवढी नोंदवली गेली. या भूकंपाचे केंद्रस्थान हे नेपाळ मधील काठमांडू पासून साधारणपणे १० किमी वर होते. तसेच भूकंपाच्या केंद्राचे अक्षांश व रेखांश २८.१ उत्तर आणि ८४.६ पूर्व आहेत.
या भूकंपाची तीव्रता एवढी प्रचंड होती कि ती १००० किमी दूरवर सुद्धा जाणवली. तसेच या केंद्राजवळ बरीच घनदाट वस्ती असल्याने बरीच पडझड झालेली आहे. नेपाळ मधील प्रसिद्ध धरहरा टॉवर कोसळला. या भूकंपाची तीव्रता उत्तर भारतातही जाणवली तसेच पुन्हा दुपारी १२.१८ मिनिटांनी परत एका हादरा जाणवला. भारतात सिलीगुडी येथे काही घरांची पडझड झाल्याचे वृत्त आले आहे. लोकांनी घाबरून जाण्याची गरज नसली तरी काळजी घ्यावी.
Image Credit (abcnews.com)
Featured Image Credit (gunaraj on twitter)